नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि माझे वडील मनमोहन सिंग हे दुबळे नसून ते एक खंबीर व्यक्तीमत्त्व असल्याचे दमण सिंग यांनी म्हटले आहे. दमन सिंग यांनी 'स्ट्रिक्ट्ली पर्सनल मनमोहन अँड गुरशरण' नामक एक पुस्तक लिहिले आहे. त्यात दमन सिंग यांनी आपल्या वडिलांच्या स्वभावाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
मनमोहन सिंग हे दुबळे व्यक्तीमत्त्व नाही. आव्हान स्विकारण्यासाठी ते नेहमी तयार राहात असल्याचे दमण यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.
माझ्या वडिलांना माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा फोन आला होता. नंतर त्यांना एका रात्रीतून देशाचे अर्थमंत्री करण्यात आले होते. त्या काळात देशाची आर्थिक स्थिती फारच बिकट होती. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी एक महिना शिल्लक होता. मात्र माझे वडील अर्थमंत्री होताच त्यांनी देशाची अर्थव्यवस्थे रुळावर आणली होती. मात्र, नरसिंह राव यांच्याशिवाय ते एकही निर्णय घेत नव्हते, असाही उल्लेख दमण सिंग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
(संग्रहीत फोटो: दमण सिंग)