नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक बाबींचा खुलासा त्यांची कन्या दमन यांनी लिहिलेल्या पुस्तकातून झाला आहे. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मनमोहनिसंग यांना अर्थमंत्री बनवण्याचा अचानकपणे निर्णय घेतला होता.
‘चांगले काम केले नाही, तर तुम्हाला बडतर्फ करून टाकू,’ असा इशारा त्या वेळी नरसिंह राव यांनी मनमोहनिसंग यांना विनोदाने दिला होता, असा खुलासा दमन सिंग यांनी लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरशरण’ या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकातील दाव्यानुसार, नरसिंह राव यांचे मुख्य सचवि पी. सी. अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री पदाचा प्रस्ताव देण्यासाठी मनमोहनिसंग यांना फोन केला. तेव्हा ते झोपलेले होते. ‘उदारीकरणाबाबत नरसिंह राव यांच्या मनात संशय होता. त्यामुळे ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र, शेवटी आम्ही करत होतो ते योग्य असल्याचे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ते मान्य केले.’