आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅशलेस सोसायटी हे भारताचे लक्ष्य, युवकांनी परिवर्तनाच्या लढाईत सेनानी व्हावे - PM मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमात भारताची कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. छोटे व्यापारी, दुकानदार, भाजी, फळ विक्रेत यांच्यासह मोलमजूरी करणाऱ्यांनीही डिजिटल बँकिंग, फोन बँकिंगचा वापर करण्याचा आग्रह पंतप्रधानांनी केला. या महिन्याच्या सुरुवातीला नोटबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला होता. त्यानंतर ते प्रथमच 'मन की बात'मध्ये देशवासियांसोबत संवाद साधत होते.
आणखी काय म्हणाले PM मोदी..
- ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाचा निर्णय घेतला तो एवढा सोपा नव्हता.
- या निर्णयाचे परिणाम ५० दिवस राहातील.
- ७० वर्षांपासूनचा रोग संपवण्यासाठी हा निर्णय घेतला.
- देशातील बँका आणि बँक कर्मचाऱ्यांनी एका महान परिवर्तनाचे व्रत म्हणून हे कार्य केले आहे.
- केवळ देशातीलच नाही तर जगभरातील अर्थशास्त्री याच्या परिणामांची पडताळणी करत आहेत.
- या निर्णयाचे यश हे देशातील नागरिकांचे आहे.
- हा निर्णय म्हणजे महायज्ञ आहे. यात अनेक जण सहभागी झाले. बँक आणि पोस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सामर्थ्याचा परिचय करुन दिला.
- १२५ कोटी देशवासियांचा सामूहिक संकल्प या देशाला उज्ज्वल करेल.
- भ्रष्टाचाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला काय करायचे ते करा पण, गरीबांना तुमच्या पापात भागीदार करु नका.
- बेनामी संपत्तीचा कठोर कायदा लागू होणार आहे, त्यामुळे गरीबांना या कायद्याच्या कचाट्यात अडकू देऊ नका.

बेनामी संपत्तीचा कडक कायदा करणार
काही लोक अजूनही काळापैसा खपवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगत मोदी म्हणाले, काही लोकांची सवय जात नाही.
- ते लोक काळेधन खपवण्यासाठी गरीबांच्या जनधन खात्यांचा आधार घेत आहेत.
- मोदींनी सांगितले, की भ्रष्टाचाराच्या तुमच्या पापात गरीबांना सहभागी करुन घेऊ नका. बेनामी संपत्तीचा कडक कायदा केला जाणार आहे, त्यामुळे गरीब त्यात नाहक भरडले जातील.
अकोल्यातील हॉटेलचा उल्लेख
- महाराष्ट्राच्या अकोल्यातील हॉटेलचा 'मन की बात'मध्ये उल्लेख.
- अकोल्यातील मराठा हॉटेलने, ५०० - १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर रस्त्याने जाणारे उपाशी राहू नये यासाठी प्रवाशांना जेवण करुन जा, नंतर जेव्हा-केव्हा या मार्गाने याल तेव्हा पैसे द्या, ही योजना सुरु केली होती.
नोटबंदीचा फायदा दिसू लागला
- गावांची परिस्थिती बदलत आहे. लोकांनी आमच्या गावात एटीएम बसवा अशी मागणी केली आहे.
- अनेक जिल्ह्यांमध्ये लोक पाणी, वीज आणि घरपट्टीचे पैसे भरत आहेत.
- जे लोक कधीच हे कर भरत नव्हते त्यांनी जुन्या नोटा बंद होत असल्यामुळे हा कर भरला.
-
आमच्या देशातील छोटे व्यापारी देशातील अर्थव्यवस्था वाढवतात आणि रोजगारही निर्माण करतात.
- आम्ही त्यांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी दिली. जर मॉल रात्रभर खुले राहात असतील तर यांनाही आपला उद्योग वाढवण्याची परवानगी असली पाहिजे.
- छोट्या व्यापाऱ्यांना आवाहन आहे की तुम्हाला संधी आहे. नोटेशिवाय व्यापार करण्याचा प्रयत्न करा.
- कार्ड स्वाइप मशिन वापरा. मोबाइल बँकिंग करा. कॅशलेस सोसायटी तयार करण्यासाठी आपली सर्वात मोठे योगदान राहिल.
मजूर बंधू - भगिणींना आवाहन
- मजूरांना वेतन मिळत असताना एका कागदावर सही घेतली जाते. त्यातील किती कापले जातात माहित नाही.
- रांगेतून बाहेर गेल्यानंतर बाहेर उभा असलेला कोणी तरी पैसे कापून घेतो. यासर्व शोषणापासून मुक्तीसाठी तुम्हीही बँकेत पेैसे जमा करा. छोटासा स्मार्टफोन वापरा.
- युवक-युवतीसाठी देशाला आर्थिक उंचीवर घेऊन जाण्याची संधी आली आहे.
- युवकांना अॅप माहित आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंग, ऑनलाइन बँकिंग माहित आहे.
- लेसकॅश सोसायटीची सुरुवात करु. कॅशलेस सोसायटीही नक्की होईल.
- कॅशलेस सोसायटी, डिजिटल बँकिंग, ई-वॉयलेट या सर्व सुविधा आज सर्व बँका देत आहेत. त्यांचा वापर करा.
- तुम्ही व्हॉट्स अॅप करता तेवढेच मोबाइल बँकिंग सोपे आहे.
- ऑनलाइन सरजार्च देखिल सरकारने बंद केला आहे. त्यामागे उद्देश आहे लोक कॅशलेस व्यवहार करु शकतील.
- डिजिटल बँकिंगमध्ये मला देशातील कोट्यवधी युवकांची मदत पाहिजे.
- तुमच्या मोबाइलमध्ये ऑनलाइन खरेदीच्या सर्व टेक्नॉलॉजी असली पाहिजे. तुम्ही दिवसभरातील काही तास हे मोबाइल टेक्नॉलॉजीने डिजिटल बँकिंग कसे करतात हे रोज दहा घरांमध्ये जाऊन शिकवा.
- छोटे दुकानदार, व्यवसायिक, भाजीवाला, चने-फुटाणे विक्रेता आणि सामान्य घरात जाऊन त्याने हे शिकवा.
- या परिवर्तनाचे सैनिक तुम्ही व्हा आणि देशाला भ्रष्टाचार मुक्ततेसाठी मदत करा.
- क्रांती ही युवकांकडून केली जाऊ शकते.
- केनिया या देशाने एम-पैसाच्या माध्यमातून सर्व व्यवहार करण्याच्या दिशेन वाटचाल केली आहे.
- युवकांना आवाहन आहे की त्यांनी यात सहभागी झाले पाहिजे.
- हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती आहे. त्यांचे पुत्र अमिताभ बच्चन यांनी देशात स्वच्छतेचे अभियान मनापासून स्विकारले आहे.
बातम्या आणखी आहेत...