आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mann Ki Baat Live Narendra Modi With Sachin Tendulkar

#MannKiBaat: विद्यार्थ्यांना मिळाल्या टीप्स, मोदी म्हणाले- उद्या माझी परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रेडिओवरील 'मन की बात' च्या 17 व्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे भाषण केले. त्यासोबत परीक्षा काळात घ्यावयच्या काळीजीच्या टीप्स दिल्या. यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि जागितक बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद देखिल त्यांच्यासोबत होते. उदया माझीही परीक्षा आहे, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि सरकारला अर्थसंकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, उद्या माझीही परीक्षा आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण मी घाबरलेलो नाही.'
काही दिवसांपूर्वी मोदींनी ट्विट करुन सांगितले होते, 'मन की बात'च्या 17व्या कार्यक्रमात ते यंग इंडिया आणि युवकांबद्दल बोलणार आहेत. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेसाठी लोकांकडून सूचनाही मागवल्या होत्या.
सचिनने दिल्या शुभेच्छा, जाणून घ्या अपडेट्स...
- माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार.
- मुलांच्या परीक्षांचा हा काळ आहे, या काळात मी त्यांच्यासोबत आहे.
- गेल्यावेळी मी जनतेकडून आणि विशेषतः शिक्षकांकडून सूचना मागवल्या होत्या. जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे.
- नरेंद्र मोदी अॅपवरही विद्यार्थ्यांसंबंधी चर्चा होत राहिली पाहिजे.
- विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे.
- मी झोपेबद्दल थोडा उदासिन आहे. माझे मित्र म्हणतात तुम्ही कमी झोपता. मात्र परीक्षा काळात पूर्ण झोप घेतली पाहिजे.
- 1 मार्चपासून सीबीएसई आणि देशातील इतर बोर्ड एक्झाम सुरु होत आहे.
- महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.
- मागीलवेळी पंतप्रधानांनी स्वच्छता मिशनवर चर्चा कोली होती.

सचिन तेंडुलकर म्हणाला - दुसऱ्यांचा दबाव घेऊ नका, स्वतःचे ध्येय निश्चित करा
- सचिन तेंडुलकर म्हणाला, विद्यार्थ्यांकडून प्रत्येक पालकांना आपेक्षा असतात. मात्र कोणत्याही दबावात अभ्यास करु नका. तुम्ही स्वतः तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
- मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर माझ्याकडूनही बऱ्याच जणांना आपेक्षा होत्या. मी माझे ध्येय निश्चित केले. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचे असतात.
- सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.
- कार्यक्रम सुरु होण्याआधीही सचिनने ट्विट करुन बोर्ड परीक्षा देणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

विश्वनाथ आनंदचा संदेश
- सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. विद्यार्थ्यांनी झोप पूर्ण घेतली पाहिजे. कोणताही दबाव घेऊ नका.
- आपल्या तयारीवर फोकस ठेवा. अति आत्मविश्वासात राहू नका.
- एकाग्रतेने परीक्षा द्या.

मुरारी बापूंनीही दिला संदेश
- कथावाचक मुरारी बापूंनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. ते म्हणाले, 'अनेकांनी नरेंद्र मोदी अॅपवर योग आणि ध्यानाबद्दल आपले सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत.'
- परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी योग फायदेशीर राहातो.
- परीक्षेदरम्यान गडबड गोंधळ करु नका. आधीचे वेळेचे नियोजन करा. परीक्षेच्या सुचना जरूर वाचा. ते पाच मिनीट तुम्हाला प्रश्न सोडविण्यासाठी तयार करतात.