आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणीला \'अच्छे दिन\'; पंतप्रधानांच्या मन की बात’ मधून दोन वर्षात 10 कोटींची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वप्रथम 3 ऑक्टोबर 2014 रोजी ऑन एअर करण्यात आला होता. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वप्रथम 3 ऑक्टोबर 2014 रोजी ऑन एअर करण्यात आला होता.
नवी दिल्ली - रेडिओवर दरमहा प्रसारित केल्या जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात कार्यक्रम' प्रचंड लोकप्रीय ठरले आहे. आकाशवाणीने अवघ्या 2 वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तब्बल 10 कोटी रुपयांची कमाई केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वप्रथम 3 ऑक्टोबर 2014 रोजी ऑन एअर करण्यात आला होता. 

33 वेळा झाले प्रसारण
- मोदींच्या मन की बात कार्यक्रमातून रेडिओला झालेल्या कमाईवर लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यास केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले. 
- 2015-2016 मध्ये रेडिओला या कार्यक्रमातून 4.78 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर, 2016-2017 मध्ये रेडिओने या कार्यक्रमाच्या माध्यमातून 5.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 
- मन की बात कार्यक्रम 18 प्रादेशिक भाषा आणि एकूण 33 बोली भाषांमध्ये प्रसारित केल्या जात आहे. पीएम मोदींच्या भाषणानंतर लगेच स्थानिक भाषांमध्येही प्रसारण केले जाते. 
- हा कार्यक्रम इंग्रजी आणि संस्कृतमध्ये देखील प्रसारित केला जातो. 
- प्रादेशिक श्रौत्यांसाठी ट्रांसमिटर आणि जगभरातील श्रोत्यांसाठी इंटरनेट आणि शॉर्टवेबवर याचे प्रसारण केले जाते.