आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी डे सेलिब्रेशन: शत्रुलाही दुःखाची जाणीव करून द्या - संरक्षण मंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (फाइल फोटो) - Divya Marathi
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (फाइल फोटो)
नवी दिल्ली - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी देशाच्या शत्रुंना इशारा देत म्हटले आहे, 'ज्यांनी आपल्याला इजा पोहोचवली आहे. त्यांना त्याचे भान तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्यांच्यासोबत तसे होत नाही.' सोमवारी आर्मी डे सेलिब्रेशनमध्ये पर्रीकरांनी एक प्रकारे शत्रूला जशास तसे उत्तर देण्याचा हा इशारा मानला जात आहे. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी पठाणकोट हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

आणखी काय म्हणाले पर्रीकर
- कोणी तुमचे नुकसान केले असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे.
- वीरगतीला नेहमीच महत्त्व दिले जाते, मात्र देशाची गरज आहे शत्रूचा निःपात.
- हे केव्हा, कसे होईल ही तुमची इच्छा आहे.
- देशावर कोणी हल्ला करत असेल, मग तो वैयक्तिक किंवा संघटीत असला तरी त्याला जशास तसे उत्तर देता आले पाहिजे. जर तुम्ही त्याला त्या वेदना दिल्या नाही तर तो परत-परत ते कृत्य करेल. त्याला त्यात आनंद वाटाला लागेल.

शहीदांबद्दल काय म्हणाले
मला देशासाठी लढलेल्या सातही शहीदांचा अभिमान वाटतो. त्यासोबत दुःखही आहे, की आमचे जवान शहीद झाले. पठाणकोटमध्ये हवाई दल आणि लष्काराने देशाचे मान उंचावली आहे. सर्वजण बहादूरीने लढले.
पुढील स्लाइडमध्ये, आर्मी डे सेलिब्रेशन फोटो...
बातम्या आणखी आहेत...