आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत \'ऑगस्टा\'वर चर्चा: ज्योतिरादित्य सिंधियांनी सोनियांना संबोधले \'शेरनी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलँड चॉपर डीलप्रकरणी संसदेत चांगलाच गदारोळ सुरु आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या डीलवरून पुन्हा एकदा कॉंग्रेसला टार्गेट केले. निवृत्त एअरचीफ एस.पी.त्यागी व आरोपी गौतम खेतान यांनी वाहत्या गंगेत हात धुतले असल्याचा आरोप पर्रीकरांनी केला आहे. पर्रीकरांनी निवेदन सादर करताना हिंदी मराठी म्हणी वापरून सभागृहात हशा पिकवला.

दुसरीकडे, कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपला आरोपांवर प्रत्युत्तर दिलेे आहे. इतकेच नाही तर त्यांनी सोनिया गांधी यांना 'शेरनी' संबोधले असून त्यांना अटक करण्‍यापूर्वी त्यांची भीती वाटायला हवी होती, असे म्हटले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया काय म्हणाले?
- ऑगस्टाप्रकरणी सीबीआय व ईडीला कारवाई करण्याची परवानगी देखील देण्यात आली होती.
उलट कॉंग्रेस सरकारच्या काळात हा सौदा रद्द करण्‍यात आला होता.
- घोटाळा समोर आल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत एफआयआर दाखल करण्‍यात आला होता.
- भाजप सरकारने 720 दिवसात काय केले.? असा सवाल सिंधियांनी उपस्थित केला
- कॉंग्रेसने पत्र लिहून ज्या देशांकडून प्रत्युत्तर मागितले होते, भाजप सरकारला तर पाठपुरावा देखील करता आला नाही.
- ऑगस्टाच्या सौद्यात घोटाळा झाल्याचे यूपीए सरकारच्या काळात संरक्षणमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते.
- नंतर कारवाई देखील यूपीए सरकारने केली होती. भाजपने नाही.
- भाजप सरकारने फिनमॅकनिकाला मागच्या दरवाज्याने प्रवेश दिला आहे.
- ज्या कंपन्यांना भाजपच्या प्रत्येक खासदारांनी विरोध केला होता, आज त्याच कंपन्यांना 'मेक इन इंडिया'त आमंत्रित केले जात आहे.
- भाजप सरकारला सोनिया गांधींची भीती वाटत आहे. ते स्वाभाविक आहे. कारण सोनिया या शेरनी सारख्या आहेत.
- इटलीच्या कोर्टाने कधीही सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. कोर्टाने केवळ त्यागी फॅमिलीच्या नावाचा उल्लेख केल्याचे सिधिंया यांनी संसदेत सांगितले.

जो आळूच्या पानांची भाजी खातो त्याचाच घसा खवखवतो- मनोहर पर्रीकर
जो आळूच्या पानांची भाजी खातो त्याचाच घसा खवखवतो, अशी मराठी भाषेतील म्हण सांगून पर्रिकर उदाहरण यावेळी दिले. यावरून संसदेत हशा पिकला. पर्रीकर यांनी शुक्रवारी संसदेत निवेदन सादर केले.

कवडीमोल दराचे हेलिकॉप्टर अव्वाच्या सव्वा दरात विक्री करण्यात आली. हा महाघोटाळा यूपीए सरकारच्या काळात झाला असून त्याला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही पर्रीकरांनी यावेळी केला. देशातील काही लोक देशाशी गद्दारी करत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला.

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी काय म्हणाले मनोहर पर्रीकर...
बातम्या आणखी आहेत...