आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणाची कॉलर पकडून सैनिक कल्याणास निधी नको : पर्रीकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई- पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देताना ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांसमाेर सैनिकी कल्याण निधीत पाच काेटी रुपये देणगी देण्याची अट ठेवली हाेती, निर्मात्यांनीही ती मान्य केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील या निर्णयावर मनाेहर पर्रीकर व्यंकय्या नायडू या दाेन केंद्रीय मंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली अाहे. ‘लष्कराच्या कल्याणासाठी काेणाची काॅलर पकडून निधी नकाे,’ अशी प्रतिक्रिया पर्रीकर यांनी दिली.

केंद्रीय संरक्षण मंत्री पर्रीकर म्हणाले, ‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी सरकारतर्फे स्वतंत्र निधी जमवला जाताे. त्यात लाेक स्वेच्छेने देणगी देत असतात, त्यासाठी काेणालाही बळजबरी केली जात नाही.’ केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘पाच काेटी रुपये लष्कराला देणगी देण्याबाबत मनसेने चित्रपट निर्मात्यांपुढे ठेवलेली अट चुकीची अाहे. अाम्ही त्यांच्याशी सहमत नाही.’

प्रस्ताव माझा नव्हताच : मुख्यमंत्री 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले अाहे. ‘पाच काेटी रुपयांची देणगी निर्मात्यांनी द्यावी असा माझा प्रस्ताव नव्हताच. राज ठाकरेंनी ताे ठेवला निर्मात्यांनीही सहमती दर्शवली हाेती. एखादी समस्या साेडविण्यासाठी एकत्र बसून चर्चा केली तर बिघडले कुठे. लाेकनियुक्त सरकार हुरियत नेत्यांशीही चर्चा करतेच ना? मी फक्त वाद मिटवण्याचा प्रयत्न केला,’ असे ते म्हणाले. 

दरम्यान, ‘ऐ दिल हे मुश्कील’ चित्रपटाच्या मध्यस्थीबाबत स्पष्टीकरण देताना ‘हुरियतशी आणि नक्षलवाद्यांशी चर्चा होऊ शकते तर, राज ठाकरेंशी का नाही’ हे मुख्यमंत्र्यानंी दिलेले स्पष्टीकरण अमान्य असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे. हुरियत आणि राज ठाकरे यांची तुलना करणे म्हणजे महाराष्ट्रात काश्मीरसारखी स्थिती आहे असे मुख्यमंत्र्यांना वाटते का? नक्षलवाद हा राष्ट्रीय प्रश्न असून मुख्यमंत्र्यांनी केलेली तुलना त्यांनी केलेल्या मांडवलीप्रमाणे चुकीची आहे असे सावंत म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...