आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार वाढले तरी पर्रीकरांना गाेवा प्रिय, राज्यात परतण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गाेव्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी अापल्या राज्यात परत जाण्याची मानसिक तयारी केलेली अाहे. किंबहुना अापण परत गेलाे नाही तर गाेव्याचे भाजपचे जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही त्यांना अाहे.  

पक्षाध्यक्ष अमित शहा अाणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गाेव्याच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर पुन्हा गाेव्यात परत येऊ शकतात, असे संकेत दिले हाेते. पर्रीकर यांनीही ‘मला जाऊ द्या की घरी’ म्हणून दिल्लीत ज्येष्ठांची मनधरणी सुरू केली अाहे.  पर्रीकर  हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अत्यंत विश्वासातील अाहेत. काही निवडक ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये माेदींच्या चाचपणीत काही जण निष्क्रिय अाहेत, तर काही चांगले असून माेदींच्या जवळ नाहीत. परंतु पर्रीकर दाेन्हीबाबत अत्यंत फिट बसतात. माेदींनी पर्रीकरांचे संरक्षण विभागातील महत्त्व अाणि अधिकारही वाढवलेत. 
 
पर्रीकर हे एकमेव मंत्री असे अाहेत की त्यांना कुणाच्याही परवानगीशिवाय किंवा कॅबिनेटपुढे मंजुरीसाठी जाण्याशिवायही २ हजार काेटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्याचे अधिकार माेदींनी बहाल  केले अाहेत. तर ३ हजार काेटी रुपयांच्या साहित्य खरेदी केवळ वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या मान्यतेसाठी जाणार अाहे. माेदींनी पर्रीकर दिल्लीत टिकावेत म्हणून या सगळ्या गाेष्टी केल्या अाहेत. परंतु पर्रीकर तयार नाहीत असेच चित्र सध्या तरी अाहे. संरक्षण विभागासाठी अत्यंत विश्वासू अाणि कार्यक्षम मंत्री म्हणून माेदींच्या डाेळ्यापुढे पर्रीकरांइतका दुसरा चेहरा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
दिल्लीत अाल्यानंतर पाच किलो वजन कमी झाले  
अाता तर पर्रीकर स्वत:च मी गाेव्याला परत जाण्यास एका पायावर तयार असल्याचे सांगत अाहेत. पत्रकारांनी विचारले असता ते ‘हाे’ म्हणून मान हलवतात. वरून सांगतात, एका वर्षात माझे पाच किलाे वजन कमी झाले. येथील पाणी अाणि जेवणही चांगले नाही, असे त्यांचे मत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...