आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon Session Suspended Congress Lawmakers To Be Back In Parliament Today

मुलायमसिंहांचे कॉंग्रेसला अल्‍टीमेटम; सरकारला विरोध करू नका, अन्यथा पाठिंबा काढू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरु झाला आहे. परंतु, विरोधकांच्या गदारोळामुळे या सत्रात एकदाही संसदेचे कामकाज पूर्णवेळ चालू शकले नाही. त्यामुळे अधिवेशनाचा हा आठवडा देखील वाया जातो की काय? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ललित मोदी प्रकरण आणि मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी कॉंग्रेसला अल्‍टीमेटम दिले. कॉंग्रेसने सरकारला विरोध करणे न थांबवल्यास सपा पाठिंबा काढून घेईल, असा सज्जड इशारा मुलायमसिंह यांनी दिला आहे. सरकारला स्पष्टीकरण देण्यास वेळ द्यायला हवा.

दरम्यान, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी प्रकरणावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ केला. राज्यसभेतही हेच चित्र दिसले. लोकसभेत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर सुषमा स्वराज यांच्यावर कॉंग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी घणाघाती आरोप केला. स्वराज यांनी पळपुट्या माणसाची मदत केल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. काँग्रेसला सभागृहाचे कामकाज होऊ द्यायचे नाही, असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कॉंग्रेसचे 25 खासदार सभागृहात परतले...