आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत ते ब्रिटनच्या पंतप्रधानांत ख्याती असलेले मांत्रिक चंद्रास्वामी यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्‍यासोबत चंद्रास्‍वामी. - Divya Marathi
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्‍यासोबत चंद्रास्‍वामी.
नवी दिल्ली - मांत्रिक चंद्रास्वामी यांचे मंगळवारी वयाच्या ६६ व्या वर्षी दीर्घ आजारामुळे निधन झाले. फेराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोटींचा दंड ठोठावल्याने २०११ मध्ये शेवटचे चर्चेत आले होते. १९८० आणि ९० च्या दशकात त्यांची थेट भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांपर्यंत वट होती. मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पंतप्रधान बनणार अशी भविष्यवाणी करणारे चंद्रा, नरसिंहा राव आणि चंद्रशेखर यांचे निकटवर्तीय होते. ब्रुनेईचे सुलतान, बहरिनच्या शेख इसा बिन सलमान अल खलिफा, हॉलीवूड कलाकार एलिझाबेथ टेलरही त्यांना भेटायला यायच्या.
 
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बहरोडमध्ये जन्मलेले चंद्रास्वामी यांचे वादाशी घनिष्ठ नाते होते. त्यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडात सामील असल्याच्या आरोपापासून फेमा आणि फसवणुकीचेही आरोप लागले. त्यांचे पूर्ण नाव नेमिचंद जैन असून ते काली मातेचे भक्त होते. बालपणीच वडिलांसोबत हैदराबादेत स्थायिक झाले. नंतर कळले की, ते अमरमुनी नामक साधूचे शिष्य बनून बिहार-नेपाळ सीमेवर तंत्रमंत्र साधना करत आहेत. चार वर्षांनंतर ते चंद्रास्वामी हे नाव धारण करूनच परतले.
 
चंद्रास्वामी यांना नरसिंहा राव अाध्यात्मिक गुरू मानायचे. राव आंध्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी चंद्रा यांना हैदराबाद युवा काँग्रेसचे सरचिटणीस बनवले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले आणि तिथे त्यांचे अनेक शिष्य बनले.
 
इंदिरा गांधींनी दिली होती आश्रमासाठी जागा: चंद्रास्वामी यांनी दिल्लीत आश्रम बनवला होता. ती जमीन इंदिरा गांधी यांनी दिल्याचा दावा केला जातो. चंद्रास्वामी हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निकटवर्तीय मानले जात.
 
१९९६ मध्ये तुरुंगात, दाऊदशीही जोडले नाव : फसवणुकीच्यागुन्ह्यात १९९६ मध्ये त्यांना तुरुंगात जावे लागले. लंडनच्या एका उद्योजकाकडून लाख डॉलरची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. बबलू श्रीवास्तव या दाऊद इब्राहिमच्या साथीदाराने चंद्रास्वामी आणि दाऊद यांचा संबंध असल्याचा खुलासा केला होता.
बातम्या आणखी आहेत...