आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील अनेक ग्रंथ दालने बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या अतिशय उच्चभ्रू वस्तीमधील ग्रंथ दालने बंद करण्याचा निर्णय दुकान मालकांना घ्यावा लागला आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रंथ सेवा सुरू होती; परंतु वाचकांना नेमके काय हवे आहे, याचा अंदाज बांधण्यात अपयश आल्याने सर्वांनाच या भागातून काढता पाय घ्यावा लागला. एकेकाळी ‘फॅक्ट अँड फिक्शन’ नावाच्या दालनासमोर वाचकांची तोबा गर्दी दिसायची. दिल्लीतील वाचकांचे ते आवडीचे ठिकाण होते; परंतु आता वाचकांचा कल लक्षात येत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे एका दालनाचे मालक अजय विक्रम सिंह यांनी सांगितले. उच्चभ्रू वस्तीमधील वाचन संस्कृती संपत चालली आहे.