आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गितेंनी पदभार स्वीकारला, शिवसेना सध्या नाराज नाही, विस्तारावेळी मांडणार भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एनडीएमधील सर्वात जुना मित्रपक्ष असणा-या शिवसेनेची मोदींवर मंत्रिपद वाटपावरून नाराजी असल्याचे वृत्त होते. एकिकडे मंगळवारी सगळे मंत्री पदाचा कारभार स्वीकारत असताना, गितेंनी मात्र आपल्याला मंत्रिपदच सांगण्यातच आले नसल्याचे सांगत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने नाराज असल्याचीही चर्चा होती. मात्र, बुधवारी पुन्हा सगळे काही आलबेल असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. गिते यांनी बुधवारीच अवजड उद्योग खात्याचा कारभारही स्वीकारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या चर्चेनंतर या तोडग्यावर समाधान काढण्यात आले आहे. सध्या खातेवाटपाबाबत किंवा मंत्रिमंडळात कमी स्थान मिळाल्याबाबत नाराज नसल्याचे गिते यांनी पत्रकारांबरोबर बोलताना स्पष्ट केले. जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, त्यावेळी पक्ष या मुद्यात लक्ष घालणार असल्याचे सांगत त्यांनी भविष्याचे संकेतही दिले. उद्धव यांनी यासंदर्भात भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडेही नाराजी व्यक्त केली होती.
गितेंनी पदभार स्वीकारला
दरम्यान, अनंत गिते यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार्यालयात जाऊन अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी अधिका-यांनी गिते यांचे स्वागत केले. देशाच्या विकासात उद्योगांचे महत्त्व असून या जबाबदारीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गिते यावेळी म्हणाले.