आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Furious Over Narendra Modi's New Cabinet Not Getting Positions

मोदींच्या शपथविधीच्या दिवशी रामदेव बाबांनी धारण केले मौन? वाचा का आहेत नाराज..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी देश विदेशातील हजारो मान्यवरांची उपस्थिती होती. पण मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी अभियान राबवणा-या रामदेव बाबांची अनुपस्थिती मात्र सोहळ्याला स्पष्टपणे जाणवत होती. माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार रामदेव बाबांनी सोमवारी सकाळपासूनच मौन धारण केले होते. त्यानंतर ते अज्ञातवासात गेल्याचे वृत्तही आले. काही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते नाराज असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले. मात्र, पतंजली योगपीठाच्या स्‍वामी बालकृष्ण यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांचे शिष्टमंडळ शपथविधीसाठी आले होते.

रामदेव बाबा हरिद्वारमध्येच असून त्यांनी मौनव्रत धारण केल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले. रामदेव बाबा यांना सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनातून खास व्हीव्हीआयपींचे निमंत्रण मिळाले होते, असे सुत्रांनी सांगितले. पण सकाळपासूनच बाबांनी अत्यंत गूढपणे वावर सुरू केला. रामदेव बाबांनी 16 मेच्या विजयाचे औचित्य साधून रामदेव बाबा यांनी तालकटोरा स्टेडियममध्ये एक भव्य स्वागत समारंभ आयोजित केला होता. भाजपचे अनेक दिग्गज याठिकाणी उपस्थित होते. पण मोदी मात्र त्याठिकाणी गेले नाहीत.
यांची होती अनुपस्थिती
ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या जयललिता, रतन टाटा, आनंद महिंद्रा, विजय मल्ल्या, दीपक पारेख, कुमार मंगलम बिर्ला, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि रजनिकांत यांचीही अनुपस्थिती होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ एका जाहिरातीच्या चित्रिकरणात व्यस्त होते. तर ममतांनी त्यांच्या दोन प्रतिनिधींना पाठवले होते.
पुढे वाचा वसुंधरा राजेंच्या नाराजीचे कारण