आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान लँड होण्याअगोदर सीट बेल्ट काढून अनेक प्रवासी राहतात उभे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही सवयी सर्वत्र सारख्याच दिसतात. टॉकीजमध्येही सिनेमा संपण्यापूर्वी काही वेळ अगोदरच उठून उभे राहणा-या लोकांची फजिती आपण पाहतो. तसेच काहीसे चित्र विमानात पाहायला मिळते. विमान लँड होण्याअगोदर सीट बेल्ट काढून अनेक प्रवासी उभे राहत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये ही सवय सारखीच दिसून येते. मागील प्रवाशांचा विचार न करता हे प्रवासी सरळ उठून उभे राहतात. प्रवाशांचा उद्धटपणाच्या वागणुकीचा अनुभव नेहमी येतो. एका पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. विमानात बसण्याचे सामान्य व्यावहारिक ज्ञानही प्रवाशांमध्ये दिसत नाही. विमान कर्मचा-याकडे तक्रार होत नाही तोपर्यंत मोबाइल स्विच केला जात नसल्याचे नेहमी पाहायला मिळणारे चित्र आहे. मोबाइल बंद केला जात नसल्याने पुरुष प्रवासी संतापल्याचे दिसून येते. त्याशिवाय महिला, मुलांचा विचार न करता आपले सीट धाडकन मागे घेणारे अशिष्ट प्रवासी हादेखील विमानातील एक डोकेदुखीचा विषय असतो. त्यावरून प्रवाशांमध्ये बाचाबाची होते.
कोणी केली पाहणी ?
इंडिया एअरलाइन एक्सपीरियन्स सर्व्हे 2013 मध्ये प्रवाशांच्या खोडसाळ आणि अशिष्ट वागणुकीचे दर्शन घडून आले. ट्रीप अ‍ॅडव्हायझर पोर्टलने त्यासंबंधी सविस्तर माहिती जाहीर केली आहे.
आवडणारी साधने
पुस्तके, आयपॅड, टॅब्लेट्स आणि आयपॉड , पोर्टेबल म्युझिक प्लेअर इत्यादी साधने प्रवाशांसोबत असतात.
मोबाइल अ‍ॅपचा सर्रास वापर
विमानातून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाइल अ‍ॅपचा वापर करतात. फ्लाइटचे पर्याय पडताळणे, वेब चेक-इनचा उपयोग करणे याला प्राधान्य दिले जाते. पाहणीतील 23 टक्के प्रवाशांनी हे मान्य केले. प्रवासात अधूनमधून किंवा नेहमीच वेब चेक-इन करतो, असे 76 टक्के प्रवाशांनी मान्य केले.