आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुड मॉर्निंग’पासून ते ‘गुड नाइट’पर्यंत नुसता टिवटिवाटच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीची धरणे असोत की आसाराम यांची अटक. राहुल गांधींचे भाषण असो की अचानक झालेला पाऊस. पिझ्झाच्या डिलिव्हरीवर, तर कधी त्यांना बुधवारबद्दल राग आहे यावर. या सर्वांबाबत आपली काही मते असलेले असे लाखो लोक आहेत आणि ते प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करतात. दिवस-रात्र! ‘गुड मॉर्निंग’ने आपल्या आगमनाची वर्दी देतात, तर ‘गुड नाइट’ने बाय- बाय! त्यांचा मोबाइल किंवा टॅबची बॅटरी संपत आहे म्हणून ते मध्येच ट्विट करून ब्रेक घेतात.
भुवनेश्वरची सुश्री परमानिक 18 वर्षांची आहे. 3 जानेवारीला ट्विटरवर नवीन प्रोफाइलसह आली. मित्रांना हाय म्हणाली! आणि सुरू झाली. मागील 22 दिवसांत तिने 550 ट्विट केले आहेत. म्हणजे दररोज सरासरी 25. मंगळवारी तिने एक तासादरम्यान टीव्ही मालिकांबाबत आपली आवड-नावड, पिझ्झा आल्याने आनंद, सुनंदा पुष्करची बातमी, रिलेशनशिपसारख्या सर्व विषयांवर 19 ट्विट केले. देशात सध्या 8.2 कोटी ट्विटर अकाउंट आहेत. 2016 पर्यंत ते 30 कोटींवर जाण्याची अपेक्षा आहे. चेन्नईच्या सूर्या हॉस्पिटलची समुपदेशक प्रीती मनोहर सांगते की, स्वत:ला व्यक्त करणे आणि ट्विटरचे व्यसन लागणे यात खूप फरक आहे. एका तासात 50-50 ट्विट करणारे लोकही आमच्याकडे येऊ लागले आहेत.
मुंबईच्या पल्लवी जगुष्टेने 29 डिसेंबर रोजी ट्विटरवर आपली प्रोफाइल बनवली होती. ती बिग बॉसमध्ये आलेल्या गौहर आणि कुशालची एवढी चाहती बनली की तिने आपल्या अकाउंटवर त्यांच्यासाठी कॅम्पेनच सुरू केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पल्लवी त्यांच्याच बाबतीत ट्विट करत होती. 115 दिवसांत तिने 13056 ट्विट केले आहेत. म्हणजेच दररोज सरासरी 113 ट्विट. ट्विटरबाबत दुस-यांच्या जीवनात काय चालू आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या लोकांमध्ये झपाट्याने नशा वाढत आहे, असे मानसशास्त्रज्ञ मानतात. ट्विटरचे काही युजर्स तर त्यांच्या सक्रियतेमुळेच प्रसिद्ध झाले आहेत. बंगळुरूचे टिनू चेरिअन अब्राहम त्यांपैकीच एक. त्यांचे प्रोफाइल पेज गुगल न्यूज पेजपेक्षा जराही कमी नाही. प्रत्येक बातमी, छोट्यातली छोटी माहिती त्यांच्या प्रोफाइलवर आहे. ते 94,507 लोकांना फॉलो करतात, तर 1,44,513 लोक त्यांना फॉलो करतात.
ट्विटचे साइड इफेक्ट
फक्त 140 शब्दांतच आपले विचार लिहा. जगातील कोणालाही टॅग करा आणि त्याच्यापर्यंत आपले म्हणणे पोहोचवा; पण ही सेवा आता अनेक लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
‘लोकांनी याच्यावर दिवसातून 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च करू नये’, असे ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्से यांनी स्वत:च सांगितले आहे.
71% ट्विटवर कोणीही प्रतिक्रिया देत नाही.
सोशल मीडियावर नेहमी ऑनलाइन राहणा-यांची स्मरणशक्ती कमी होते. कारण मेंदूचा जो भाग एखाद्या प्रश्नावर तत्काळ उत्तर देतो, तो अन्य कुठे तरी व्यग्र असतो.
- स्टॉकहोम रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधन
यापासून दूर राहिल्यावर कसे वाटते?
अमेरिकेत ट्विटर व फेसबुकचा जास्त वापर करणा-या विद्यार्थ्यांना 24 तास सोशल नेटवर्कपासून दूर ठेवण्यात आले. मग त्यांचे मत विचारले-
32% नशा
26% औदासीन्य
12% वैफल्य
14% गोंधळ