आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Questions Raised Over Ved Pratap Vaidik Meeting With Hafeez Saeed

दहशतवादी हाफिज सईदची भेट घेणारे पत्रकार वैदिक यांची NIA करणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची पाकिस्तानात जाऊन भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 'एनआयए'शिवाय 'आयबी'चे अधिकारी देखील त्यांची सखोल चौकशी करणार आहेत.
या दोन्ही तपास यंत्रणा वैदिक - सईद भेटीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'चा हात होता का? याचा शोध घेणार आहेत. पाकिस्तानात कडेकोट बंदोबस्तात असलेल्या सईद पर्यंत वैदिक कसे पोहोचले, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
वैदिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला
एनआयए आणि आयबीच्या चौकशीच्या अडकण्याबरोबरच पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याविरोधात वाराणसी आणि इंदूरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाराणसीत एका वकिलांनी सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर 27 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तर, इंदूरमध्ये वैदिक यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे विवेक खंडेलवाल यांनी वकिलामार्फत आयपीसी कलम 124 ए आणि 132 नुसार तक्रार दाखल केली आहे. वकिलांनी वैदिक यांच्याविरोधात 'देशद्रोह' आणि 'विद्रोह पसरवण्याचा प्रयत्न' या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उच्चायुक्तांनी सरकारला अहवाल दिला
वैदिक आणि सईद भेटी संदर्भात पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, उच्चायुक्तांचा या भेटीत कोणताही सहभाग नव्हता. या भेटीबद्दल त्यांना माहिती देखील देण्यात आली नव्हती. या भेटीवरुन वादंग सुरु झाल्यानंतर सरकारने उच्चायुक्तांकडून अहवाल मागविला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच त्याबद्दल संसदेत माहिती दिली होती. वैदिक यांनी हाफिज सईद याची पाकिस्तानात भेट घेतली आणि भारतात परतल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भेटीतील वृत्तांत कथन केला. येथे क्लिक करुन वाचा, सईदने वैदिक यांना विचारले मोदींच्या पत्नी कशा आहेत?

आयएसआयची भूमिका ?
वैदिक आणि सईद भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हफिज चाचड यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या इच्छेशिवाय कोणत्याही भारतीय पत्रकाराला त्याला भेटता येणे शक्यच नाही.
चाचड यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की सईदला भारतीय पत्रकाराने भेटणे ही सामन्य बाब नाही. आयएसआयच्या मर्जीशिवाय ही भेट शक्यच नाही. या वृत्तात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
- सईदची भेट घडवून आणण्यात नेमके कोणाच्या प्रयत्नांना यश आले?
- वैदिक यांनी सईदला भारत सरकारच्या वतीने काही संदेश दिला का?
- सईदने वैदिक यांच्यामाध्यमातून भारत सरकारला काही निरोप पाठवला का?