नवी दिल्ली - डोंगराळ प्रदेशात होत असलेल्या जोरदार पावसामुळे हायड्रो पॉवर प्लांट्स बंद पडायला लागले आहे. आतापर्यंत 10 केंद्र बंद पडल्याची माहिती आहे. याचा थेट परिणाम उत्तर भारतातील राज्यांवर पडला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये वीज संकट बिकट होत चालले आहे. याचे एक कारण उष्णता वाढल्याने मैदानी प्रदेशांमध्ये वीजेची मागणी वाढली आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे वीज संकट अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका दिवसाला 2100 मेगावॉट वीजेची कमतरता
- नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरच्या अहवालानुसार, 18 ऑगस्टच्या सायंकाळी उत्तर भारतात 59 हजार 113 मेगावॉट विजेची गरज होती. तर, 57 हजार 13 मेगावॉट वीज पुरवठा झाला. म्हणजेच 2100 मेगावॉट वीजेची कमतरता होती. एकट्या दिल्लीला एका दिवसासाठी 4500 मेगावॉट वीजेची गरज असते.
- अहवालात हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की 18 ऑगस्टला दिवसभर जवळपास दीड कोटी यूनीट वीज कपात झाली.
कोणते पॉवर प्लांट ठप्प
1. विष्णु प्रयाग, उत्तराखंड
2. मनेराभाली, उत्तराखंड
3. कुलहल, उत्तराखंड
4. धालीपुर, उत्तराखंड
5. डाकरानी, उत्तराखंड
6. रिहंद, उत्तर प्रदेश
7. उबरा, उत्तरप्रदेश
9. प्रभाती, हिमाचल
10. चुटक, जम्मू काश्मीर
कोणत्या राज्यात किती वीज कपात
राज्य एकूण शॉर्टेज
उत्तर प्रदेश 1545 मेगावॉट
हरियाणा 227 मेगावॉट
राजस्थान 771 मेगावॉट
जम्मू-काश्मीर 512 मेगावॉट
काय आहे कारण
- उत्तर प्रदेशात सध्या वीज संकटाची दोन कारणे सांगितली जात आहेत. एक कारण आहे मागणी वाढली असल्याचे तर, दुसरे आहे डोंगराळ राज्यांमध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे हायड्रो पॉवर प्लांटमध्ये उत्पादन कमी होत आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने दिली.
- जोरदार पावसामुळे उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे वीज कपात होत आहे. अधिकारी म्हणाले येत्या काही दिवसांमध्ये ही कपात वाढू शकते.