आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल साडेचार वर्षांनंतर सुरेश जैन यांना जामीन, जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी | नवी दिल्ली/धुळे/जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांना अखेर साडेचार वर्षांनंतर जामीन मिळाला. सर्व महत्त्वाचे साक्षीदार तपासले गेल्याने निकालास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता पाहता न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.ए.बाेबडे न्या.अशाेक भूषण यांच्या पीठाने हा जामीन मंजूर केला.

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. निशांत कंठेश्वरकर यांनी जैन यांच्या जामिनास विराेध केला. परंतु, न्यायालयाने लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने अादेशात म्हटले की, खटल्यात १५७ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली अाहे. खटल्याचे काम वेगाने सुरू असले तरी निकालास वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लागू शकताे. फिर्यादी पक्षाने ३० जून २०१६पर्यंत मुख्य साक्षीदार तपासले असल्याची माहिती सरकारी पक्षातर्फे दिली. अाराेपी साडेचार वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कारागृहात असल्यामुळे अाराेपीस जामीन देण्यात येत अाहे. खटल्यात सुरेश जैन यांच्यातर्फे अॅड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

अाजसुटका हाेणार :
जैनयांना जामीन मंजूर झाल्याची प्रत शनिवारी प्राप्त हाेणार आहे. त्यानंतर कारागृहातून त्यांची सुटका हाेईल. जामीन मिळाल्याचे समजताच जैन कुटुंबीयांचे चेहरे अानंदाने फुलले. सुरेश जैन यांच्या चेहऱ्यावरही प्रथमच मनमाेकळे हास्य फुलले. त्यांच्या समर्थकांनाही जल्लोष केला.

१६३५दिवसांनी जामीन : घरकुलप्रकरणात सुरेश जैन यांना १० मार्च २०१२मध्ये अटक केली. त्यानंतर यातील इतर अाराेपींना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. सुरेश जैन यांना वर्षे महिने २३ दिवसांनंतर जामीन मिळाला.
आता असे असेल जळगावचे राजकारण
> जैन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय शत्रूत्‍व सर्वश्रुत आहे.
> सध्‍या जळगाव महापालिकेवर जैन गटाची सत्‍ता आहे.
> खडसेंच्या वाढदिवशीच जैन यांना जामीन मंजूर झाला आहे.
> आता जैन तुरुंगातून बाहेर येणार असल्याने खडसे यांची डोकेदुखी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बातम्या आणखी आहेत...