आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ : जंक फूडवर 14.5 % फॅट टॅक्‍स, असा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - ज्‍या रेस्‍तारॉंमध्‍ये बर्गर, पिज्‍जा, डोनट्ससारखे पदार्थ विकले जातात त्‍यांच्‍यावर 14.5 % फॅट टॅक्‍स लावण्‍याचे निर्णय केरळ सरकारने घेतला. विशेष म्‍हणजे असा ठराव करणारे केरळ हे देशातील पहिलेच राज्‍य ठरले आहे.
वसुली ग्राहकांच्‍या खिशातून की रेस्‍तरॉंच्‍या कमाईतून ?
> हा कर ग्राहकांच्‍या खिशातून वसूल करायचा की रेस्‍तारॉंच्‍या कमाईतून हे अद्याप निश्चित झाले नाही.
> या बाबतचा निर्णय कॉर्पोरेटवर सोडला असल्‍याचे केरळ वित्‍त मंत्रालयाच्‍या सचिवांनी सांगितले.
> हा कर मॅक्‍डोनल्‍ड, डॉमिनोससारखे फूड चेन्‍सवर लागू होणार आहे.
> सरकार लवकरच त्‍याचे धोरण आणि नियम स्‍पष्‍ट करणार आहे.

वर्षाकाठी 10 कोटींची भर
> केरळ सरकारकाच्‍या अर्थ विधेयकादरम्‍यान हा निर्णय घेण्‍यात आला.
> यामुळे सरकारच्‍या तिजोरीत वर्षाकाठी 10 कोटी रुपयांची भर पडणार आहे.
बातम्या आणखी आहेत...