आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला \'आऊट\' करण्‍यासाठी सिद्धूचा \'आवाज-ए-पंजाब\', \'आप\'ची \'फि‍ल्‍ड‍िंग\' अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचेमाजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही अकाली नेत्यांना सोबत घेऊन ‘आवाज- ए- पंजाब’ नावाचा नवा पक्ष स्थापण्याची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांना सामावून घेण्याचे ‘आप’चे प्रयत्न फोल ठरले आहेत.

पंजाबचा सत्यानाश करणाऱ्या सर्व शक्तींशी लढण्यासाठी आम्ही येत्या तीन-चार दिवसांत नवा पक्ष स्थापणार आहोत, असे अकाली दलातून निलंबित केलेले नेते प्रगत सिंग यांनी सांगितले. सिद्धूंचा पक्ष पंजाब विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असून त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाची नाराजी ओढवून घेतल्यानंतर सिद्धू यांनी भाजपशी फारकत घेतली होती.
यांचीही साथ
> सिद्धू यांच्‍या नव्‍या पक्षात माजी हॉकीपट्टू परगट सिंह, आमदार सिमरजित सिंह बैंस आणि त्यांचे भाऊ बलविंदर सिंह बैंस यांचाही समावेश आहे.
> परगट सिंह यांनी एक फोटो शेअर करून यासंबंधीची माहिती दिली.

'आप'ची 'फि‍ल्‍ड‍िंग' अपयशी
सिद्धू यांनी भाजपचा तंबू सोडल्‍यानंतर त्‍यांना 'आप'ल्‍यात समावून घेण्‍यासाठी अरविंद केजरीवाल यांनी 'फि‍ल्‍ड‍िंग' लावली होती. पण, सिद्धू यांनी नवा पक्ष स्‍थापन करून आश्‍चर्याचा षटकार खेचला. शिवाय कॉंग्रेसलाही वाकुल्‍या दाखवल्‍या.

आता पंजाब विधानसभेचे मैदान मारण्‍यासाठी सज्‍ज
आपल्‍या नव्‍या पक्षाला आणि संवगड्यांना घेऊन सिद्धूंनी आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्‍याची तयार केली आहे. त्‍यांच्‍या पुढे भाजप, कॉंग्रेससह आम आदमी पक्षाचेही आव्‍हान असेल.
9 सप्‍टेंबरला होणार अधिकृत घोषणा
सूत्रांच्‍या माहितीनुसार, सिद्धच्‍या नव्‍या पक्षाची अधिकृत घोषणा येत्‍या 9 सप्‍टेंबरला होऊ शकते. नव्‍या पक्ष स्‍थापनेच्‍या वृत्‍ताला त्‍यांच्‍या पत्‍नी नवजोत कौर यांनीही दुजोरा दिला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...