आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या सदस्यत्वावरून एनएसजीमध्ये पडली फूट; व्हिएन्नात चर्चाच झाली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- अणुपुरवठादार गटात भारताला सदस्य करून घेण्यात यावे यासाठी अमेरिकेने जोर लावला अाहे. परंतु एनपीटी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांबाबत एनएसजी सदस्यांत फूट पडली आहे. व्हिएन्नातील बैठकीत भारताच्या सदस्यत्वावर मुळात चर्चाच झाली नाही, असा भलताच दावा आता चीनने केला आहे.


अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न करणाऱ्या देशांत भारताचाही समावेश होतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी म्हटले आहे. ९ जून रोजी व्हिएन्नात एनएसजीच्या ४८ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अधिकृत नव्हती. एनएसजीचे अध्यक्ष तथा अर्जेंटिनाचे राजदूत राफेल मारिआनो ग्रॉसी यांनी ही बैठक घेतली होती. बैठकीसाठी कोणतीही विषयपत्रिका नव्हती. केवळ राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन २४ रोजी सेऊल येथे होणाऱ्या बैठकीची तयारी करण्याचा उद्देश होता, असे चीनकडून सांगण्यात आले. पाकिस्तानने एनएसजीमध्ये भारताला सदस्य करण्यासंबंधीच्या मागणीला जोरदार आक्षेप घेतल्यानंतर चीनचेही समर्थन मिळवले होते.

जॉन केरी यांचे पत्र
सेऊलमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात भारताला सदस्यत्व देण्याचा मुद्दा चर्चिला जाणार आहे. त्यात अडथळा आणला जाऊ नये, यासाठी अमेरिकेने जोर लावला आहे. भारताच्या सदस्यत्वाचे जोरदार समर्थन करताना परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी एनएसजीच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवून पाठिंब्याचे आवाहन केले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सदस्‍यत्‍व मिळाल्‍याने काय फायदा होणार ?
बातम्या आणखी आहेत...