आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी हॅकर्संनी केल्‍या सात भारतीय दुतावासांच्‍या वेबसाइट हॅक, वाचा काय लिहिले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्‍वी दौरा आणि एनएसजी (अणू पुरवठादार गट) सदस्यत्वासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोने भारताला पाठिंबा दिला. त्‍यामुळे पाकिस्‍तानचा तीळपापड झाला असून, 'सपोर्टिंग' या पाकिस्तानी हॅकर्स ग्रुपने सात देशांतील भारतीय दुतावासांच्‍या वेबसाइट हॅक केल्‍यात.
या पाकिस्तानी हॅकर्स ग्रुपने स्‍वत:ला 'घुसघोर' आणि 'रोमांटिक' म्‍हटले. एवढेच नाही हॅक केलेल्‍या भारतीय वेबसाइट्सवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे लिहिले.
या सात देशांतील वेबसाइट्स केल्‍या हॅक
ज्‍या देशांतील भारतीय दुतावासांच्‍या वेबसाइट हॅकर्स ग्रुपने हॅक केल्‍या त्‍यात तुर्की, ग्रीस, मॅक्सिको, ब्राजील, रोमानिया, तजाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हॅक केलेल्‍या वेबसाइट्सवर अजून काय लिहिले...
बातम्या आणखी आहेत...