आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाने केला पंतप्रधानाच्‍या बंगल्‍याबाहेर मध्‍यरात्री गोळीबार, उडाला गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येथील 7 आरसीआर रस्‍त्‍यावर असलेल्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय बंगल्‍याच्‍या बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्‍या एका पोलिस हेड कॉन्स्टेबलच्‍या AK-47 रायफलमधून बुधवारी मध्‍यरात्री चुकून गोळ्यांचे तीन राउंड फायर झाले. त्‍यामुळे गोंधळ उडाला. या प्रकरणी चाणक्यपुरी पोलिस ठाण्‍यात भादंविच्‍या कलम 336 नुसार गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे.
कशी झाली फायरिंग?
> सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पंतप्रधानाच्‍या घराबाहेर तैनात पीसीआर व्‍हॅन व्‍ह‍िक्टर 35 चे हेड कॉन्स्टेबल अमरपाल हे ड्युटी बदलत असताना त्‍यांच्‍याकडून 'मिसफायर' झाला. त्‍याच्‍याकडून एकापाठोपाठ एक तीन गोळ्या सुटल्‍या. त्‍यावर तत्‍काळ इतर कर्मचारी, अधिकारी आले. या घटनेत कुठलीही हानी झाली नाही.
> या बाबत हेड कॉन्स्टेबल अमरपाल यांनी स्‍वत: सेंट्रल पोलिस कंट्रोल रूमला कॉल करून माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, ते जेव्‍हा पीसीआरचा चार्ज घेत होते तेव्‍हा त्‍यांच्‍या रायफलमधून चुकून फायरिंग झाली.''
पोलिसावर कारवाई होणार
> या घटनेनंतर कमल अतातुर्क मार्गावर कडक सुरक्षेचा बंदोबस्‍त करण्‍यात आला. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
> हा काही कट आहे का, या दिशेनेही गुप्‍तचर यंत्रणा तपास करत आहे.
> ज्‍या पोलिसाच्‍या रायफलमधून या गोळ्या सुटल्‍या त्‍याला निलंबित करण्‍याच्‍या हालचाली सुरू आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...