आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याने ताजमहल, लालकिल्‍ला, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन विकले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍ही अभिताब बच्‍चन यांची प्रमुख असलेला मि. नटवरलाल पाहिलाय ? 'बंटी आणि बबली'मध्‍ये विदेशी पर्यटकांची फसवणूक करणारे प्रेमी युगुल पाहिले. पण, या कथा सत्‍यघटनेवर आधारित आहेत. मिथिलेश कुमार श्रीवास्तव ऊर्फ नटवरलाल या ठक्‍याने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली. त्‍याच्‍यावर 100 पेक्षा अधिक गुन्‍हे दाखल असून, पोलिसांनी अटक केल्‍यानंतही तो नऊवेळा फरार झाला होता. त्‍याचीच रंजक कहानी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत...
ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकलं
या खऱ्या खुऱ्या नटवरलाने विदेशी पर्यटकांना भारताचे राष्‍ट्रीय वैभव ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकले होते. बिहारच्‍या सीवान जिल्‍ह्यातील जीरादेई गावातील तो मूळ रहिवाशी होता. त्‍याच्‍या 'नटवर लीला' ने केवळ बिहारच नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली सरकारही त्रस्‍त झाले होते. त्‍यामुळेच त्‍याला पकडून देणाऱ्यांना एकाच वेळी तब्बल 8 राज्यांनी बक्षीस जाहीर केले होते. आता ही व्यक्ती जिवंत नाही. पण, तिचे किस्‍से आजही आणि येणाऱ्या कैक पिढ्यांपर्यंत जिवंत राहतील.

पुढील स्‍लाइडवर वाचा, राष्‍ट्रपतीची खोटी सही करून काढले होते पैसै