आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आज भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - मार्क झुकेरबर्ग

नवी दिल्ली - फेसबूकचा सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग गुरुवारी भारताच्या दोन दिवसीय दौ-यावर येत आहे. मार्क भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या दोघांमध्ये सोशल मिडियाच्या मदतीने सरकारी कामकाजाला बळ मिळावे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे अशा मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि यूरोप फेसबूकचे मोठे यूजर मार्केट आहे. पण आगामी काळात भारत ही परिस्थिती बदलू शकतो. झुकेरबर्ग भारत दौ-यात 'Internet.org कंटेट आणि त्याची उपयोगिता' या विषयावरील परिषदेतही सहभागी होणार आहे. या परिषदेत बहुतांश लोकांपर्यंत इंटरनेट सहज कसे पोहोचवता येईल अशा विषयावर चर्चा होणार आहे. या परिषदेत टेक इंडस्ट्रीचे दिग्गज आणि उद्योगपती ऑनलाइन सव्हीर्सेसमध्ये इंग्रजीशिवाय इतर भाषांच्या वापराच्या शक्यतांवर चर्चा करतील.

ब्लिपरचे सीईओ अंबरीश मित्रा यांनी सांगितले की, सध्या मोदी सरकारचे लक्ष टेक्नॉलॉजीच्या जागरुकतेवर आहे. नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान सोशल नेटवर्किंग साइट्सचा चांगलाच वापर केला होता. त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर सुमारे सात लाख फॉलोअर आहेत. तर त्यांच्या फेसबूक पेजवर 2.3 कोटी लाइक्स आहेत.