आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Zuckerberg Will Answer Questions In Townhall At Delhi

टाऊनहॉलच्या माध्यमातून झुकेरबर्ग करणार Internet.org चे रीब्रॅन्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या महिन्यात फेसबूकच्या हेडक्वार्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मार्क झुकेरबर्ग. - Divya Marathi
गेल्या महिन्यात फेसबूकच्या हेडक्वार्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मार्क झुकेरबर्ग.
सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकचे फाऊंडर मार्क झुकेरबर्ग त्यांचा पुढील 'टाऊनहॉल क्यूए' दिल्लीत करणार आहेत. 28 ऑक्टोबरला इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी) मध्ये येत आहेत. स्वतः मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबूक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. या दौऱ्याबाबत झुकेरबर्ग म्हणाले की, सोशल साइट्सवर भारतीय मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे भारतीयांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. Internet.org. बाबत झुकेरबर्ग यांचा हा पहिला दौरा असेल. भारतात सध्या 13 कोटी फेसबूक यूझर्स आहेत.

मोदींबरोबर केले होते टाऊनहॉल
यापूर्वी गेल्या महिन्यात झुकेरबर्ग यांनी अमेरिकेमध्ये फेसबूकच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर टाऊनहॉलचे आयोजन केले होते. यादरम्यान ते म्हणाले की, माझी कंपनी फेसबूकच्या इतिहासात भारताचे खास महत्त्व आहे. ही एक असी कथा आहे, ज्याचा उल्लेख मी आजवर सार्वजनिकरित्या केलेला नाही.

काय आहे टाऊनहॉल...
> फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग जगातील मोठ्या हस्तींबरोबर टाऊनहॉलमध्ये प्रश्नांची उत्तरे देतात.
> झुकेरबर्ग प्रश्नांची उत्तरे अत्यंत अनोख्या शैलीमध्ये देत असतात.
> 2010 मध्येही त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याबरोबर अशाच एका सेशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यात बुश यांनी त्यांच्या ‘‘डिसीजन पॉइंट”साठी कँपेनिंग केले होते.
> जुकेरबर्ग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबरही असे सेशन केले आहे.

Internet.org म्हणजे काय...
> Internet.org हे फेसबूक इनिशिएटिव्ह आहे.
> फेसबूकने केलेल्या दाव्यानुसार कंपनीचा उद्देश गरीबांना इंटरनेटशी जोडणे हा आहे. त्यात आरोग्य, करिअर, शिक्षण अशा माहितीसाठी मोफत मॅसेजिंगची संधी मिळणार आहे.
> फेसबूक त्यासाठी मोबाइल ऑपरेटर आणि सरकारचा पाठिंबा मागत आहे.
> तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये त्याचा वापरही सुरू झाला आहे.
> वादानंतर झुकेरबर्ग यांनी यामुळे नेट न्युट्रिलिटीचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
> फेसबुकने वादग्रस्त Internet.org च्या मोबदल्यात फ्री बेसिक्सची घोषणा केली आहे.
> Internet.org वर नेट न्युट्रिलिटीबाबत भारतात प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या दरम्यान “I support digital India” चे प्रोफाइल पिक्चर बनवण्याच्या मुद्यावरून हा वाद सुरू झाला होता. Internet.org ला पाठिंबा देण्याचा प्रयत्न आहे. मात्र नंतर फेसबूककडून ही शंका दूर करण्यात आली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, टाऊनहॉलमध्ये आईच्या आठवणीने गहिवरले होते मोदी...