आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनी केली संघाची तुलना मुस्लिम लीगशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. विशेषत: संघाला टीकेचे लक्ष्य करताना काटजू यांनी संघाची तुलना मुस्लिम लीगशी केली आहे. मोदी सरकारने केलेले विकासाचे सर्व दावे पोकळ ठरल्याचा आरोपही न्या. काटजू यांनी केला आहे.

काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला करताना म्हटले आहे की, संघाची स्थापनादेखील मुस्लिम लीगप्रमाणेच इंग्रजांच्या शासनकाळात झाली. फूट पाडा व शासन करा हे इंग्रजांचे धोरण चालवण्यासाठी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जातीयवादी असल्याचे सांगून काटजू यांनी दोन्ही संस्था धार्मिक तणाव व दंगे वाढण्याच्या बळावरच वाढतात व तग धरून राहतात. आपल्या ब्लॉगमध्ये काटजूंनी मोदी सरकारवरदेखील आरोप केला आहे. सरकारच्या कामकाजाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काटजू यांनी संघ व भाजप सरकारवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहेत, असा आराेप केला. मोदी सरकारने केलेले विकासाचे सगळे दावे पोकळ व बाष्कळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.