आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Markandey Katju \'escorted\' Out Of Court, SC Slaps Contempt Notice On Former Judge

कोर्टाने काटजूंना बाहेर काढण्याचे दिले निर्देश, सौम्या खटल्याच्या निकालावर केली होती टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सौम्या हत्याकांडात न्यायमूर्तींच्या निकालावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांना सर्वोच्च न्यायालयाने पाचारण केले. शुक्रवारी काटजू कोर्टरूममध्ये पोहोचताच तीन न्यायमूर्तींच्या पीठाने त्यांचे स्वागत केले खरे, मात्र १० मिनिटांतच त्यांना कोर्टरूमबाहेर काढण्याचे निर्देश दिले.
काटजू दुपारी २.०० वा. न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठासमोर हजर झाले. न्या. गोगोई म्हणाले, न्यायालयाच्या मदतीसाठी धन्यवाद. तुम्ही तुमच्या ब्लॉगमधील टिप्पणीबाबत बाजू मांडा. काटजू म्हणाले, हे हत्येचे प्रकरण होते. नंतर त्यांनी अनेक निकालांचे दाखले दिले. यावर न्या. गोगोई म्हणाले, मि.काटजू ब्लॉगच्या टिप्पणीसंदर्भात युक्तिवाद केल्यास बरे होईल. त्यापासून दूर जाल तर आम्हीही कक्षा वाढवून तुमच्या ब्लॉगच्या अन्य टिप्पणींची दखल घेऊन सुनावणी सुरू करू. न्यायालयाने हत्याकांडाची फेरविचार याचिका फेटाळली. यानंतर कोर्ट काटजूंच्या टिप्पणीबाबत अॅटर्नी जनरलांची बाजू जाणून घेतली. अॅटर्नी जनरलनी टिप्पणी ही न्यायालयाच्या अवमानासारखी असल्याचे म्हटले. यावर काटजू म्हणाले, हा माझा ब्लॉग आहे. कायदा आपल्याला कोणत्याही मुद्द्यावर स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार देतो. त्यावर न्या. गोगोई म्हणाले, आम्ही अॅटर्नी जनरलच्या म्हणण्याशी सहमत आहोत. मि. काटजू तुमच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाचा खटला का चालवू नये. यावर अॅटर्नी जनरल म्हणाले, माझे मत बदलले असून यास भावनेच्या भरात केलेली टिप्पणी म्हणू शकतो. मात्र, न्यायालयाने काटजूंविरुद्ध अवमाननेची नोटीस जारी करण्याचा आदेश दिला. यावर काटजू संतापत म्हणाले, मि. गोगाई, तुम्ही मला ज्युनियर आहात. अशी वागणूक तुम्हाला शोभत नाही. यानंतर गोगोई यांनी सुनावणी स्थगित केली. काटजूंनी केलेल्या टि्वटमध्ये सुनावणीस उभे राहिल्यानंतर गोगोईंनी ठरवून केलेले नाट्य लक्षात आले. तिथे सौम्या प्रकरणाच्या सुनावणीबाबत कोणी गांभीर्याने पुढाकार घेतला नव्हता.

काटजू यांनी सौम्या खटल्याच्या निकालावर केली टीका
२३ फेब्रुवारी २०११ रोजी केरळच्या गोविंदाचामीने सौम्याला रेल्वेखाली फेकून दिले व नंतर बलात्कार केला. उपचारादरम्यान सौम्याचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाचामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर काटजू यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. त्यांनी निकालाच्या आढाव्याची मागणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...