आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्शल अर्जनसिंग अनंतात विलीन, एअरफोर्सची फ्लायपास्टने मानवंदना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मार्शल अर्जनसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. - Divya Marathi
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मार्शल अर्जनसिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली - एअरफोर्सचे एकमेव मार्शल अर्जनसिंग यांच्यावर सोमवारी दिल्लीत बरार चौकात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या सन्मानात राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतवण्यात आले आहे. देशाच्या या वायुपूत्राला पूर्ण सन्मानात अखेरचा निरोप देण्यात आला. मार्शल अर्जनसिंग यांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होत्या. मार्शल हे कधीही निवृत्त होत नसतात. मार्शल अर्जनसिंह हे वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत कार्यरत होते.
 
1965 च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे व वायुदलाचे एकमेव मार्शल अर्जनसिंह (98) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेराच श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी शनिवारी रुग्णालयात भेट घेतली होती.
 
अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. स्वंतत्र भारताच्या पहिल्या लढाईत एअरफोर्सने कमान सांभाळली होती तेव्हा अर्जुनसिंग हे एअरफोर्सचे प्रमुख होते. भारताच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये 5 स्टार रँक मिळवण्याचा गौरव आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यापैकी अर्जुनसिंग एक होते. 
 
फील्ड मार्शल मानिक शॉ, केएम करियप्पा, अर्जन सिंह या तिघांनाच हा बहुमान मिळालेला होता. 2002 मध्‍ये अर्जुन सिंह यांची 5 स्टार रँकसाठी निवड झाली होती. अर्जन सिंह पाकिस्‍तानातील फैसलाबाद येथे 15 एप्रिल 1919 ला त्‍यांचा जन्‍म झाला होता.
 
मार्शल कधीच निवृत्त होत नाही...
- देशामध्ये आतापर्यंत एअर मार्शल अर्जनसिंग, फिल्ड मार्शल मानिक शॉ आणि के.एम.करिअप्पा यांना 5 स्टार रँक मिळाली होती. मार्शल हे कधीच निवृत्त होत नाहीत. 
- अर्जनसिंग यांना 2002 मध्ये 5 स्टार रँक मिळाली होती. 
- त्यांचा जन्म 15 एप्रिल 1919 मध्ये आताच्या पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे झाला होता. त्यांना देशाचा दुसरा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 
- मार्शल अर्जनसिंग यांनी 60 पेक्षा अधिक प्रकारची विमाने उडवली होती. 
 
राष्ट्रपतींचा शोक संदेश 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मार्शल अर्जनसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी भारतीय वायूसेनेच्या शूरयोद्धाच्या निधनानंतर शोक संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, त्यांच्या कुटुंबासह भारतीय वायूसेनेसोबत माझ्या संवेदना व्यक्त करतो. 65च्या युद्धातील ते शूर योद्धे होते. त्यांना त्यावेळी दाखवलेली बहादुरी ही महत्त्वाची होती. 
 
मोदींनी शेअर केल्या आठवणी 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले, 'भारतीय वायूसेनेचे मार्शल अर्जनसिंग यांच्या निधना देशाला दुःख झाले आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या अजोड योगदानाला देश कधीही विसरणार नाही. भारतीय वायूदलाची ताकद वाढवे हे त्यांचे ध्येय होते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी अखेरपर्यंत सैनिकी शिस्त जपली होती. प्रकृती बरी नसतान ते माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना श्रद्धांजली देण्यासाठी व्हिलचेअरवरुन आले. प्रकृती बरी नसताना देखील त्यांनी व्हिलचेअरवरुन उभे राहून सलामी दिली होती. ही त्यांच्यातील सैनिकीशिस्त होती.'
बातम्या आणखी आहेत...