आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'वो मर्द नही जो डर जाए\' भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी अहवालापूर्वी म्हणाली नवाज शरीफांची कन्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात असताना मरियमने रविवारी दोन ट्वीट केले आहेत. - Divya Marathi
विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात असताना मरियमने रविवारी दोन ट्वीट केले आहेत.
इस्लामाबाद / नवी दिल्ली - पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ माजणाऱ्या पनामागेट प्रकरणाचा चौकशी अहवाल सोमवारी जाहीर होणार आहे. हा अहवाल जाहीर होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवाज शरीफ यांच्या कन्येने विरोधकांना आव्हान दिले आहे. जो भीतो तो मर्द नाही अशा शब्दात तिने आपण आणि आपले कुटुंबीय चौकशीला भीत नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह त्यांची कन्या मरियम आणि समस्त कुटुंबीय भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत. सर्वच विरोधक शरीफांचा राजीनामा मागत आहेत.
 

मरियमचे आव्हान...
- विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात असताना मरियमने रविवारी दोन ट्वीट केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त चौकशी समहूाने (जेआयटी) यापूर्वीच नवाज यांच्या कन्या आणि मुलाची चौकशी केली आहे. 
- ट्वीट करून मरियम म्हणाली, जो भीतो तो मर्दच नाही. यानंतर आणखी एक ट्वीट केले. त्यानुसार, "तुम्ही (विरोधक) या प्रकरणाला राजकीय लढाईचे स्वरूप देत असाल, तर हा लढा आजच्या घडीला पीएमएलएन (नवाज यांचा पक्ष) पेक्षा चांगल्या प्रकारे कुणीही लढू शकणार नाही."
- शरीफ यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या विरोधात भ्रष्टाचार बद्दल चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कर बुडवेगिरी, परदेशात बेनामी संपत्ती, फ्लॅट आणि कंपन्या बाळगण्याचे आरोप आहेत. 
- विरोधकांच्या दबावामुळे हे पाकच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला पोहचला आहे. तसेच जेआयटी सुद्धा स्थापित करण्यात आली आहे. याच जेआयटीचा चौकशी अहवाल 10 जुलै रोजी जाहीर केला जात आहे. त्यापूर्वीच नवाज यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी क्रिकेटपट्टू आणि राजकारणी इमरान खान त्यांचा राजीनामा मागत आहेत. 
 
 
काय आहे पनामागेट प्रकरण?
पनामा येथील वकिलाती कंपनी मोझॅक फोन्सेका मॅनेज केलेल्या सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांच्या परदेशातील बेनामी संपत्तीची हजारो कागदपत्रे गेल्या वर्षी लीक झाली. यात 140 नेत्यांसह, नेत्यांचे निकटवर्ती आणि शेकडो सेलिब्रिटीजचा (भारतीय सुद्धा) देखील समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे, पाकिस्तानचे नवाज शरीफ आणि कुटुंबीय आहेत. यातील काहींनी तर दुसऱ्या देशांमध्ये कर कमी असल्याने गुंतवणूक आणि कंपन्यांची स्थापना केली होती. पनामा देशात ही कंपनी आणि लीकेज झाल्याने जगभरातील माध्यमांनी या घोटाळ्यास पनामागेट असे म्हटले आहे.
 
पुढील स्लाईडवर... मरियमचे ट्वीट...
बातम्या आणखी आहेत...