आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Massive Landslide In Meghalaya Cuts Off Road Access To Parts Of Assam Tripura

मेघालयात लँडस्लाइड : दोन हायवे ठप्प, आसाम, त्रिपूरा-मणिपूरशी देशाचा संपर्क तुटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली - मेघालयमधील तानचेन येथे भूस्खलन झाले आहे. जैंता हिल्सचा मोठा भाग कोसळला आहे. यामुळे आसाम, त्रिपूरा आणि मणिपूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बंद झाला आहे. या तिन्ही राज्यांशी देशाचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे नागालँडमध्ये एक राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.
नागालँडमध्येही लँडस्लाइड, NH-29 ठप्प
नागालँडमध्ये मंगळवार आणि बुधवारी अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. गेल्या एक महिन्यात राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भूस्खलन होत आहे. नागालँड आणि मणिपूरची लाइफलाइन समजल्या जाणारा राष्ट्रीय महामार्ग -29 (NH-29) ठप्प झाला आहे. जोरदार पावसामुळे जुन्हेबोतो जिल्ह्यातील अनेक भागात भूस्खलन झाले आणि घरे, रस्ते वाहून गेले आहेत.
दोन आठवड्यांपासून गावांचा संपर्क तुटला
अघुनातो शहरात झालेल्या लँडस्लाइडमुळे गावाचा आणि शहराचा दोन आठवड्यांपासून संपर्क तुटला आहे. कित्येक दिवसांपासून लोकांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होऊ शकलेले नाही.
नॉर्थ-इस्टमध्ये जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान खात्याने नॉर्थ-इस्ट भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून धोक्याचा इशारा दिला आहे. 19 - 20 ऑगस्ट रोजी मेघालय आणि आसाममध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्ट गोरा हिल्स जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव पथक तैनात ठेवले आहे. अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून लोकांना सुरक्षीत स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.