आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह 100 देशांमध्‍ये इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्‍ला, केवळ 300 डॉलर्सची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारतासह जगभरातील 100 देशांमध्‍ये इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्‍ला झाला आहे. याची सुरुवात शुक्रवारी झाली. युकेतील राष्‍ट्रीय आरोग्‍य सेवेवर सर्वप्रथम हल्‍ला झाला. यामुळे युकेतील अनेक हॉस्पिटल्‍स, कॉम्प्‍युटर्स आणि फोन बंद पडले. त्‍यानंतर अनेक देशातील हॉस्पिटल्‍स, सरकारी वेबसाईट्स आणि मोठ्या कंपन्‍यांच्‍या वेबसाईट्सवर हल्‍ला झाला. भारतात किती कंपन्‍या आणि सरकारी वेबसाईट्सवर याचा परिणाम झाला, हे अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही.
 
या हल्‍ल्‍याला 'रॅनसमवेअर अटॅक' म्‍हटले जात आहे. यामध्‍ये हॅकर्स प्रथम वेबसाईट हॅक करुन त्‍यावरील डाटा लॉक करतात आणि तो अनलॉक करण्‍यासाठी पैशांची मागणी करतात. जोपर्यंत तुम्‍ही हॅकर्सची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्‍हाला कॉम्‍प्युटर हाताळता येत नाही.
 
हॅकर्सनी केली फक्‍त 300 डॉलर्सची मागणी
- तब्‍ब्‍ल 100 देशातील वेबसाईट हॅक करुन हॅकर्सनी हा डाटा अनलॉक करण्‍यासाठी केवळ 300 डॉलर्सची मागणी केली आहे.
- त्‍यांनी असे का केले? यामागे त्‍यांचा काय उद्देश आहे? हे अद्याप समजलेले नाही.
 
कोणी केला हल्‍ला?
- हॅकींग करणाऱ्या ग्रुपचे नाव 'शॅडो ब्रोकर्स' असे सांगितले जात आहे. मात्र ते नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
 
1 तासात 75 हजार सायबर हल्‍ले 
- स्‍वीडन, ब्रिटन आणि फ्रान्‍स या देशांनी सर्वात प्रथम सायबर हल्‍ला झाल्‍याची माहिती दिली. 
- जगभरात एका तासातच 75 हजार सायबर हल्‍ले झाले आणि मागील 24 तासांत 1 लाख सिस्‍टीमवर याचा परिणाम झाला, अशी माहिती एका कंपनीने दिली आहे. तसेच  
- या हल्‍ल्‍यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते असे रशिया आणि तैवान यांनी म्‍हटले आहे.
- या हल्‍ल्‍याचा स्‍पेनमधील अनेक टेलिकम्‍युनिकेशन्‍स कंपन्‍यांवर परिणाम झाला आहे.
- कास्‍पर्स्‍की लॅब सिक्‍युरिटी रिसर्चर्सने 99 देशांत 45 हजारपेक्षा अधिक सायबर हल्‍ला झाल्‍याची माहिती दिली आहे. यामध्‍ये भारत, ब्रिटन, रशिया, इटली, चीन, युक्रेन या या देशांचा समावेश आहे.
 
हॅकर्सनी पुढील शुक्रवारपर्यंत दिला वेळ
- हॅकर्सनी 300 डॉलर्स एका संगणकासाठी मागितले आहेत, एका कंपनीसाठी मागितले आहेत जगभरातील संपूर्ण हल्‍ल्‍यासाठी मागितले आहेत हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. 
- डेली मेल युकेच्‍या वृत्‍तानूसार ज्‍या कॉम्‍पयुटर्सना हॅक केले त्‍यांच्‍या स्क्रीनवर एक संदेश दिसत आहे. त्‍यामध्‍ये पैसे देण्‍यासाठी पुढील शुक्रवारपर्यंतचा वेळ हॅकर्सनी दिला आहे. 
 
अमेरीकेच्‍या गुप्‍तचर संस्‍थेनेच डेव्‍हलप केला होता प्रोग्राम 
- अमेरीकेची गुप्‍तचर संस्‍था (NSA)ने डेव्‍हलप केलेले  सॉफ्टवेअर वापरुनच हा हल्‍ला झाल्‍याचे समोर येत आहे. 
- 'हॅकर्सनी अमेरीकेच्‍या नॅशनल सिक्‍युरिटी एजन्‍सीची (NSA) वेबसाईट हॅक करुन तो प्रोग्राम ऑनलाईन लिक केला', असे वृत्‍त डेलीमेलने दिले आहे.     
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- अमेरीकेच्‍या चुकीचा परिणाम 100 देशांना भोगावा लागणार का? स्‍नोडेनने दिला होता इशारा 
- मायक्रोसॉफ्ट विंडोजला सर्वाधिक धोका 
    
 
 

 
बातम्या आणखी आहेत...