आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Massive Tremors Were Felt In North India And Maharashtra

भूकंपाचा भारतालाही दणका, आतापर्यंत 37 ठार; नाशिकमधील 80 लोक अडकले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बंगालच्या सिलिगुडीत भूकंपामुळे इमारत कोसळली.)
नवी दिल्ली- नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी भूकंपाने उत्तर भारतासह महाराष्ट्राचा काही भाग हादरला. राज्यात नागपूरसह नजीकच्या काही भागात सौम्य झटके जाणवले. भारतात एकूण 37 जणांचा भूकंपात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात बिहारमधील 25, उत्तर प्रदेशातील 9 आणि पश्चिम बंगालमध्ये 3 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातील 125 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातील महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील 80 लोक असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये छत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. कानपुरमध्ये एका जुनी इमारत पडल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. बिहारमधील सीतामढी येथे इमारत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. उत्तर बिहारमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलिगुडीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याने दहा लोक जखमी झाले.
नेपाळमध्ये रिश्टर स्केवर 7.9 तिव्रतेचा भूकंप आला. उत्तर भारतात हा धक्का सुमारे 5 रिश्टर स्केलचा होता.
पुढील स्लाईडवर बघा, भारतात रिश्टर स्केलवर असा नोंदवण्यात आला भूकंपाचा धक्का...