आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Match Fixing In IPL Chennai Match Fixing News In Marathi

चेन्नईचे अनेक सामने फिक्स? प्लॅन विंदूचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल-6मध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे एकच नव्हे तर अनेक सामने फिक्स असल्याची चर्चा आहे. बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन व विंदू दारासिंह यांच्यातील संवादातून हा गौप्यस्फोट झाला आहे. बुकीच्या सांगण्यावरून मयप्पनने धोनी व रैनाशी संपर्क साधल्याचेही समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मयप्पन व विंदू दारासिंगच्या फोन कॉल आवाजाचे नमुने घेतले आहेत. दोघांनी एकत्र मिळून मॅच फिक्सिंग केल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. आयपीएल-6 मधील 12 ते 15 मेदरम्यान झालेल्या सामन्यांची माहिती मयप्पनच्या माध्यमातून विंदूकडे, त्याच्याकडून बुकींना मिळत होती. त्यानंतर सट्टेबाजी केली जात होती.
धोनी, रैनाशी केला होता संपर्क : तामिळनाडूचे माजी एसपी जी. संपत यांनी एका चॅनलला सांगितले की, बुकीच्या सांगण्यावरून मयप्पनने धोनी व रैनाशी संपर्क साधला होता. बुकी विक्रम अग्रवालने मयप्पनला चेन्नईच्या काही खेळाडूंशी बोलायला सांगितले होते.
मयप्पन-विंदूतील संवाद उघड : ट्रान्सस्क्रिप्टमध्ये दोघे 12 मे 2013ला चेन्नई व राजस्थानच्या सामन्याबद्दल बोलत होते. चेन्नई या सामन्यात 140 धावा करेल, असे मयप्पन सांगतो. सामन्यात चेन्नईने 141 धावा केल्या. मयप्पनने या सामन्यावर 14 कोटींचा सट्टा लावला होता. सामना राजस्थान रॉयल्सच जिंकेल, असे तो विश्वासाने विंदूला सांगतो. संवादानुसार, आयपीएल-6मध्ये मुंबई व सनरायझर्सच्या सामन्याआधीच मयप्पनने त्याचा निकाल विंदूला कळवला होता.
प्लॅन विंदूचा
मयप्पन चेन्नई संघाचा टीम प्रिन्सिपल होता. तो प्रत्येक माहिती विंदूला पुरवत असे. बहुतांश सामने सुरू होण्याआधी मयप्पनच्या इनपुटच्या आधारे विंदू पुढचा प्लॅन आखायचा. मपय्पन सांगेल तितक्याच धावा चेन्नई संघाच्या व्हायच्या.