आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MaukaMauka : आफ्रिदीला फॅनची विनंती, आता तरी दाखव सिक्स कसा मारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हिडीओमध्ये यावेळी एक पाकिस्तानी फॅन शाहीद आफ्रिदीला भावनिक विनंती करत असल्याचे दाखवले जात आहे. - Divya Marathi
या व्हिडीओमध्ये यावेळी एक पाकिस्तानी फॅन शाहीद आफ्रिदीला भावनिक विनंती करत असल्याचे दाखवले जात आहे.
नवी दिल्ली - T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 19 मार्चला कोलकात्याच्या मॅचपूर्वी ट्विटरवर पुन्हा एकदा #MaukaMauka ट्रेंडींगमध्ये आले आहे. या नव्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी फॅन शाहीद आफ्रिदीला विनंती करत अशल्याचे दाखवण्यात आले आहे. 'इस बार तो दिखा दो कि छक्का कैसे मारते हैं' असे हा फॅन आफ्रिदीला म्हणत आहे. दरम्यान कोलकात्यात होणाऱ्या या सामन्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान मौका मौकाच्या या जाहिरातींनी चांगली प्रसिद्धी मिळवली होती. प्रत्येक मॅचनंतर पुढच्या मॅचसाठी आता काय असणार अशी उत्सुकता लागून राहिलेली असायची. त्यामुळेच टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर पुन्हा एकदा ही जाहिरात व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर आफ्रिदीबाबत सुरू असलेले कमेंट्स
- एका मॅसेजमध्ये लिहिले आहे की, आफ्रिदी इंडिया-पाकिस्तान मॅचची तयारी करत आहे, पण त्याच्या हातात इंग्लिश स्पिकिंगचे पुस्तक आहे.
- आणखी एका फनी मॅसेजमध्ये आफ्रिदी एक कॉमेंट करताना दाखवला आहे, न्यूझीलंडने भारताला हरवले, आता याचा बदला ते आम्हाला हरवून घेणार.. असे तो म्हणतो.

अमिताभ-शफाकत अमानत अली गाणार राष्ट्रगीत
- दरम्यान ईडन गार्डन्सवर 19 मार्चला मॅचपूर्वी अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे हे कनफर्म केले आहे.
- तसेच पाकिस्तानी सिंगर शफाकत अमानत अली त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत गातील.

आफ्रिदी काय म्हणाले..
- आफ्रिदीने म्हटले होते की, आम्ही भारतात नेहमीच क्रिकेट एन्जॉय केले आहे. आम्हाला याठिकाणी आमच्या देशापेक्षा अधिक प्रेम मिळते.
- या वक्तव्याने पाकिस्तानी फॅन्सनी त्यावर हल्ला चढवला होता.
- पाकिस्तानच्या एका वकिलाने तर त्याच्या विरोधात लाहोर हायकोर्टात अर्जही दाखल केला होता. कोर्टाने याबाबत आफ्रिदीकडून प्रत्युत्तर मागवले आहे.
- तसेच आफ्रिदीच्या वक्तव्याने नाराज असलेले मियादाद एखा चॅनेलशी बोलताना म्हणाले होते, आम्ही काय त्यांना दगड मारतो का. अपयशी असूनही त्यांना खेळवतो.
नंतर दिले स्पष्टीकरण
- या वादानंतर आफ्रिदी म्हणाला, मी केवळ पाकिस्तानी टीमचा कॅप्टन नाही. मी पूर्ण पाकिस्तानी जनतेच्या वतीने येथे आलो आहे. माझ्या बोलण्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करावा.
- माझ्यासाठी पाकिस्तान किंवा पाकिस्तानी जनतेपेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. मीडियाच्या एका प्रश्नाचे मी पॉझिटिव्ह उत्तर दिले. आम्ही जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
- वसीम अक्रम, वकार यूनूस हेही सांगतील की, त्यांना भारतात प्रेम मिळते. त्याचे कारण म्हणजे भारतात क्रिकेटची पुजा होते. इम्रान खान यांना विचारा. भारत पाकिस्तानचे संबंध नेहमी क्रिकेटमुळे सुधारले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...