आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maulana Masood Azhar Identified By India As \'handlers\' Behind Pathankot Attack

मसूदच होता दहशतवाद्यांचा हँडलर, 17 वर्षांपूर्वी सरकारने नेऊन सोडले होते कंधारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौलाना मसूद अझहर (फाइल फोटो) - Divya Marathi
मौलाना मसूद अझहर (फाइल फोटो)
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यास आलेल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सचा उलगडा झाला आहे. 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ रऊफ आणि आणखी त्याचे दोन साथीदार हल्लेखोरांना आदेश देत होते. मसूद हा तोच दहशतवादी आहे, ज्याला 1999 मध्ये विमान अपहरणानंतर कंधारला नेऊन सोडण्यात आले होते. पठाणकोट हल्ल्यानंतर 14-15 जानेवारीला होणाऱ्या भारत-पाक परराष्ट्र सचिवस्तरीय बैठकीवर सस्पेन्स कायम आहे.
मौलाना मसूद अझहरच हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर, तसेच अश्फाक आणि काशीम हेच पठाणकोट हल्ल्यामागील हँडलर आहेत, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. हल्ल्याचा कट लाहोरजवळ रचण्यात आल्याचे पुरावे भारताला मिळाले आहेत,अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. त्याबाबतची माहिती योग्य चॅनलमार्फत पाकिस्तानला देण्यात आली आहे. या चौघांवर कडक कारवाई करावी, असे भारताने बजावले आहे.
काय आहे विमान हायजॅक प्रकरण
- 24 डिसेंबर 1999 रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी 178 प्रवाशी असलेले इंडियन एअरलाइन्सचे आयसी - 814 विमान हायजॅक केले होते.
- हायजॅक करण्यात आलेले विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर उतरवण्यात आले होते.
- दुबईत काही प्रवाशांना सोडून देण्यात आले होते.
- 25 वर्षांचा भारतीय नागरिक रुपिन कात्याल याचा मृतदेह विमानातून बाहेर फेकण्यात आला होता.
- दहशतवाद्यांनी भारत सरकार समोर 178 प्रवाशांच्या मुक्ततेसाठी तीन दहशतवाद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव ठेवला होता.
- अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील तत्कालिन सरकारने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तीन दहशतवाद्यांना सोडले होते. त्यापैकीच एक होता मौलाना मसूद अझहर.
या दहशतवाद्यांना सोडले
- मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख.
- मसूद अझहरने 2000 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली.
पुढील स्लाइडमध्ये, नवाज शरीफांनी केला होता पीएम मोदींना फोन
बातम्या आणखी आहेत...