आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maulana Masood Azhar Is The Mastermind Of Pathankot Attack

17 वर्षांपूर्वी कंधारला नेऊन सोडलेला मसूद अझहर हल्ल्याचा मास्टरमाईंड ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैश-ए-मोहम्मदची स्थापन करणारा मसूद अझहर (फाइल फोटो) - Divya Marathi
जैश-ए-मोहम्मदची स्थापन करणारा मसूद अझहर (फाइल फोटो)
नवी दिल्ली - पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहर असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएच्या काळात 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे हायजॅक झालेले विमान सोडवण्यासाठी अझहरला अफगाणिस्तानातील कंधार येथे नेऊन सोडण्यात आले होते.

अझहरच्या संपर्कात होते दहशतवादी
अशी माहिती आहे, की पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या करणाऱ्यांनी पाकिस्तानातील बहावलपूर येथे सॅटेलाइट फोने बातचीत केली होती.
- गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार अझहरचा मुक्काम बहावलपूर येथेच आहे. तो जैशच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो.
- तपास यंत्रणांनी शक्यता व्यक्त केली आहे, की दहशतवाद्यांनी बहावलपूर येथे मसूद अझहरसोबतच बातचीत केली. या संभाषणात कोडवर्डचा वापर करण्यात आला होता.

काय आहे विमान हायजॅक प्रकरण
- 24 डिसेंबर 1999 रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी 178 प्रवाशी असलेले इंडियन एअरलाइन्सचे आयसी - 814 विमान हायजॅक केले होते.
- हायजॅक करण्यात आलेले विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर उतरवण्यात आले होते.
- दुबईत काही प्रवाशांना सोडून देण्यात आले होते.
- 25 वर्षांचा भारतीय नागरिक रुपिन कात्याल याचा मृतदेह विमानातून बाहेर फेकण्यात आला होता.
- दहशतवाद्यांनी भारत सरकार समोर 178 प्रवाशांच्या मुक्ततेसाठी तीन दहशतवाद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव ठेवला होता.
- अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील तत्कालिन सरकारने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तीन दहशतवाद्यांना सोडले होते. त्यापैकीच एक होता मौलाना मसूद अझहर.
या दहशतवाद्यांना सोडले
- मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख.
- मसूद अझहरने 2000 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली.

एनएसए डोभाल गेले होते कंधारला
- सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे दहशतवाद्यांना कंधारला घेऊन जाणाऱ्या विमानात होते. त्या विमानात तत्कालिन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह आणि इतर काही उच्चस्तरीय अधिकारी होती. अफगाणिस्तानमध्ये तेव्हा तालिबानी सरकार होते, ते पाकिस्तानच्या संपर्कात होते.
पुढील स्लाइडमध्ये, कंधार विमानतळावर उभे हायजॅक झालेले भारतीय विमान