आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा, मायावतींची जोरदार मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अखिलेश यादव सरकार अपयशी ठरले आहे. मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीची जबाबदारी घेऊन समाजवादी पक्षाच्या सरकारने राजीनामा द्यावा. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.
मुजफ्फरनगर दंगलीवर बोलाताना मायावती म्हणाल्या, की मुजफ्फरनगर दंगल पीडित अजूनही दंगलीच्या झळांमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत. समाजवादी पक्ष गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवर बोलतो. परंतु, मुजफ्फरनगर दंगलीवर काहीही भाष्य करीत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता असताना या दंगली झाल्या होत्या. त्याची जबाबदारी या पक्षाने घ्यायला हवी.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात बोलताना मायावती म्हणाल्या, की नरेंद्र मोदींना त्यांनी केलेल्या कामाचा कितीही अभिमान वाटत असला तरी मुस्लिम त्यांना कधी घाबरणार नाहीत किंवा त्यांच्याकडे जाणार नाहीत. भाजपने हजार वेळा जरी माफी मागितली तरी मुस्लिम त्यांना माफ करणार नाही. नरेंद्र मोदी आणि मुलायमसिंह एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांमध्ये कोणताही फरक नाही. गुजरात सरकार सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने एका डॉक्टरला मारहाण केली आहे. परंतु, याकडे लक्ष द्यायला समाजवादी पक्षाच्या सरकारकडे वेळ नाही.