आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींचा राजीनामा मंजूर; राज्यसभेत बोलण्याची संधी न दिल्याने होत्या नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यसभेत बोलण्याची संधी दिली नसल्याचे सांगत मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला. (फाईल) - Divya Marathi
राज्यसभेत बोलण्याची संधी दिली नसल्याचे सांगत मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला. (फाईल)
नवी दिल्ली - राज्यसभा सभापति हमीद अंसारी यांनी बहुमजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी मंजूर केला आहे. राज्यसभेत बोलण्याची संधी दिली नसल्याचे सांगत मंगळवारी त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला. तसेच रागाच्या भरात सभागृह सोडून बाहेर पडल्या. याच्या काही मिनिटांतच त्यांनी आपला 3 पानांचा राजीनामा सुपूर्द केला. 
 
 
मंगळवारी नेमके काय झाले?
- राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजता सुरू होताच मायावतींनी नोटीस देऊन बोलण्याची परवानगी मागितली. उपसभापती पी.जे. कुरियन यांनी त्यांना 3 मिनिटांचा वेळ दिला. मायावती बोलण्यासाठी उभ्या असताना सभागृहात एकच गदारोळ निर्माण झाला. 
- गदारोळात कुरियन यांनी त्यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या 7 मिनिटांपर्यंत बोलत होत्या. यानंतर मायावती आणि उपसभापतींमध्ये वाद झाला. त्यावेळी मायावतींनी भर सभागृहात राजीनाम्याचा इशारा दिला, तसेच रागाच्या भरात बाहेर पडल्या. त्याच दिवशी संध्याकाळी मायावतींनी आपला 3 पानांचा राजीनामा उपराष्ट्रपती हमीद अंसारी (राज्यसभा सभापती) यांना सुपूर्द केला. 
 
 
राजीनाम्यात काय लिहले?
- बसप अध्यक्ष मायावतींनी लिहले, की ''सरकारसमोर मला दलितांच्या हितासाठी बोलण्याची संधी मिळत नसेल तर माझे राज्यसभेत राहण्याला काहीच अर्थ नाही. अशात मला माझ्या समाजाचे संरक्षण करता येत नाही. मला बोलण्याची संधीच मिळत नसेल तर सभागृहात राहण्याचाही मला काहीही अधिकार नाही. त्यामुळे, मोठ्या पीडेने मी सदस्त्याचा राजीनामा देत आहे. कृपया राजीनामा मंजूर करावा.''
- मायावती यांचा कार्यकाळ एप्रिल 2018 मध्ये संपुष्टात येत आहे. 
 
 
लालू म्हणाले, मायावतींना पुन्हा राज्यसभेवर पाठवू
- लालू प्रसाद यादव म्हणाले, मायावती गरीब आणि दलितांच्या नेत्या आहेत. त्या सहारनपूरच्या घटनेचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू इच्छित होत्या. मात्र, सरकारच्या लोकांनी एकत्रित होऊन त्यांना रोखले. यावरून दुखी होऊन मायावतींनी राजीनामा दिला. दलित आणि मागासवर्गियांवर बोलू देण्याची संधी मिळत नसेल तर सभागृहात राहून अर्थ नाही. 
- आम्ही मायावतींना समर्थन देत आहोत. तसेच त्यांच्या धाडसाचेही कौतुक करावे लागेल. त्यांची इच्छा असल्यास त्यांनी पुन्हा राज्यसभेत यावे. आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत. 
 
 
पुढे... VIDEO, रागाच्या भरात अशा बाहेर पडल्या मायावती आणि त्यांचे राजीनामा पत्र...
बातम्या आणखी आहेत...