आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षानंतर कॉलेज बदलाची मेडिकल विद्यार्थ्यांना मुभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्राने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कॉलेज बदलण्याचे नियम आणखी सोपे केले आहेत. त्यानुसार विद्यार्थी एका वर्षानंतर आपले कॉलेज बदलू शकतील. राज्यांतर्गत कॉलेज बदलायचे असल्यास त्यासाठी एमसीआय किंवा आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज करण्याची गरज नाही. राज्याच्या आरोग्य सचिवांच्या परवानगी हा बदल करता येईल. आधीच्या आणि नव्या कॉलेजकडून विद्यार्थ्यांना नाहरकत प्रमाणपत्र मात्र घ्यावे लागेल. एखाद्या विद्यापीठाशी हे कॉलेज संलग्न असल्यास विद्यापीठाचेही नाहरकत लागेल. राज्याबाहेर बदलासाठी एमसीआयकडे अर्ज करावा लागेल.