आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत तीन महापालिकांच्या निवडणुकीत 54 टक्के मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली महापालिका निवडणुकीत ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे. दोन उमेदवारांच्या निधनामुळे २७२ पैकी २७० प्रभागांतच मतदान झाले. गेल्या वेळी ५४ टक्के मतदान झाले होते, या वेळी त्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज राज्याचे निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
 
उत्तर दिल्ली पालिकेच्या १०३ प्रभागांत, दक्षिण दिल्लीच्या १०४ तर पूर्व दिल्लीच्या ६३ प्रभागांत मतदान झाले. मतमोजणी २६ एप्रिलला होईल. अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे नादुरुस्त झाल्याच्या तक्रारीही आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यावरून आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, मतदानाची आकडेवारी मिळण्यात विलंब लागल्याबद्दल आयोगाने कर्मचाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.
 
भाजपला एकतर्फी बहुमत; २१८ ते २२० जागा शक्य
एक्झिट पोलमध्ये तिन्ही महापालिकांत भाजपला एकतर्फी बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. एकूण २७२ जागांपेकी भाजपला २१८ ते २२०, आपला २४ ते ३५ आणि काँग्रेसला २२ ते ३१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...