आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपच्या पराभवाची पाच कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीमधील तीन महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर निकालानुसार सलग तिसऱ्यांदा दिल्लीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेसही काही खास कमाल दाखवू शकलेली नाही. भाजपचा विजय आणि आप व काँग्रेसच्या पराजयाची कारणे जाणून घेण्यासाठी DainikBhaskar.com ने दिल्लीतील राजकारण जवळून अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांशी खास बातचित केली. 

1 - आप नेते आता 'आम' राहिले नाही, त्यांचा इगो दिसायला लागला
- ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश म्हणाले, भाजपचे राजकारण हे फॉर्म्यूला आणि घट्ट पकड यावर सुरु आहे. तर, केजरीवाल, आप आणि दिल्ली सरकारची पकड सैल होत चालली आहे. केजरीवालांची धोरणे आणि त्यांच्यासोबत राहाणाऱ्यांचे वर्तन लोकांना नाराज करत आहे. एमसीडीमधील भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही जनतेने भाजपला पर्याय शोधलेला नाही. याचाच अर्थ मोदी-शहा जोडीवर जनतेचा विश्वास कायम आहे. 
- केजरीवाल सरकारने शिक्षण आणि आरोग्य या फक्त दोनच आघाड्यांवर चांगले काम केले आहे. समाजाच्या दृष्टीने त्यांची ही मोठी कामगिरी होती, तरीही दिल्लीच्या जनतेला प्रभावित करण्यात आप नेते कमी पडले. कदाचित आप नेत्यांवर जनतेची नाराजी राहिली असावी. आम आदमी पार्टीचे नेते आता 'आम' राहिले नाहीत. 
- जनतेला त्यांचे व्यक्तीकेंद्रीत आणि स्वतःच फक्त स्वच्छ आणि पवित्र मानत बाकी सर्व बेईमान असल्याचा डांगोरा पिटणे पसंत पडलेले दिसत नाही. पक्षाने याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 
 
2 - EVM वर उपस्थित केलेले प्रश्न 
- उर्मिलेश म्हणाले की आता केजरीवाल परभवाचे खापर हे ईव्हीएम मशिनवर फोडतील. मात्र त्याचे पुरावे देऊन त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अधिक योग्य होईल. पुराव्याशिवाय असे आरोप करणे म्हणजे लोकशाहीत जनमताचा अनादर करणे आहे. 
- ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही भाजपच्या लोकप्रियतेवर त्याचा परिणाम झालेला नाही. जनता अशा आरोपांकडे पराभूत मानसिकतेच्या नेत्यांची वायफळ बडबड, या दृष्टीने पाहाते. 
- ईव्हीएममध्ये काहीच घोळ होऊ शकत नाही, असा दावा मी करत नाही. असे सांगत उर्मिलेश म्हणाले, गडबड होऊ शकते परंतू ठोस पुराव्यांशिवाय त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. 
 
3 - आपने दिल्लीसोडून इतर राज्यांवर दिले लक्ष्य 
- ज्येष्ठ पत्रकार व्ही.एस. तिवारी म्हणाले, दिल्ली महापालिकेच्या निकालाने आपचा पुढील मार्ग अवघड असल्याचे संकेत दिले आहे. जनतेमध्ये त्यांची इमेज फक्त झाडूवाला पक्ष झाली आहे. हा पक्ष काम कमी आणि आरोप जास्त करत आला आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या या पक्षाकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या. मात्र केजरीवाल यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते उत्तर प्रदेशात लक्ष्य देत राहिले. पंजाब, गोवा येथे त्यांना जास्त रस असल्याचे दिसले यामुळे दिल्लीकडे दुर्लक्ष्य झाले. 
 
4 - जनतेकडे दुसरा पर्याय नव्हता
- वरिष्ठ पत्रकार ज्ञानेंद्र बरतारिया म्हणाले, देशात मोदी लाट आहे. सगळीकडे पंतप्रधानांसोबत उभे राहाण्याची स्पर्धा लागली आहे. मतदारांनी उमेदवार कोण आहे हे पाहिले नाही की त्यांनी भाजपच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिला, त्यांनी फक्त मोदींकडे पाहून भाजप उमेदवारांना मतदान केले. मतदारांकडे दुसरा पर्याय नव्हता. 
- दिल्लीतील जनता आम आदमी पक्षाच्या कारभारावर नाराज होती. याचे संकेत राजौरी गार्डन पोटनिवडणुकीतच मिळाले होते. केजरीवालांनीही हे मान्य केले होते. 
 
5 - काँग्रेस नेतृत्वावरुन जनतेचा विश्वास उडाला 
- ज्येष्ठ पत्रकार गौतम लहरी म्हणाले, की लोकांचा काँग्रेस नेतृत्वावरुन विश्वास उडाला आहे. फक्त गांधी नाव आहे म्हणून त्यांचे नेतृत्व स्वीकराण्यास जनता तयार नाही. काँग्रेसही त्या एकमेव नावावर जास्त दिवस तग धरू शकत नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसबद्दलचे जे मत लोकांच्या मनात तयार झाले आहे ते अद्याप दूर झालेले नाही. 
- दुसरीकडे भाजपकडे कलेक्टिव्ह लिडरशिप आहे. नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. 
 
हे पण वाचा... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...