आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली मनपा निवडणूक पराभवानंतर 'आप'मध्ये राजीनामा सत्र, पक्ष नेतृत्वावर अशी होते टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. आपचे नेते एका पाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. बुधवारी पक्षाचे दिल्ली प्रदेश संयोजक दिलीप पांडे यांनी राजीनामा दिला होता. गुरुवारी संजय सिंह यांनी पंजाब प्रभारीपदाचा राजीनामा दिला. 
  
सिंह यांनी ट्विट केले की, मी पंजाब प्रभारी पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्याकडे दिला असून सह प्रभारी दुर्गेश यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. 
  
 पंजाब विधानसभांमध्ये आम आदमी पक्षाला विजयाची अपेक्षा होती. येथील निवडणुकीला एक महिना उलटून गेल्यानंतर संजय सिंह यांनी दिल्लीतील पराभवानंतर पंजाब प्रभारी पद सोडल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर आता सर्वसामान्य लोक प्रश्न उपस्थित करत आहेत, की एवढ्या उशिरा राजीनामा देण्याचे कारण काय? सामान्य जनते प्रमाणेच पक्षांतर्गतही अनेक आवाज उठत आहेत. 
 
बुधवारी निकाल येण्यास सुरुवात झाल्यानंतर आपच्या अनेक नेत्यांनी पराभवासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला जबाबदार ठरविले तर, आपच्या नेत्या अलका लांबा यांनी यासाठी ईव्हीएम नाही तर इतरही कारणे जबाबदार असल्याचे म्हटले होते. 
 
दिल्लीच नाही गोवा-पंजाबातही पराभव 
गोवा, पंजाब आणि आता दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात विरोधी सूर उमटायला लागले आहेत. पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी दिल्लीतील पराभवानंतर पक्ष नेतृत्वावरच हल्लाबोल सुरु केला. मान बुधवारी म्हणाले होते, 'पक्ष नेतृत्व गल्ली क्रिकेट टीमप्रमाणे वागत आहे.'
 
दिल्लीकरांनी आपला 'झाडू'न साफ केले 
- दिल्लीतील तिन्ही महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकला आहे. 
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 54 टक्के मतदान झाले होते. मात्र महापालिका निवडणुकीत फक्त 24 टक्क्यांवर पक्ष थांबला आहे. 
- पंजाबात आपने 117 जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त 20 जागांवर त्यांना यश मिळाले होते. 
- मान यांनी म्हटले  होते की पक्ष नेतृत्वाने इव्हीएमला जबाबदार ठरविण्याऐवीज आत्मचिंतन केले पाहिजे. 
- दिल्लीतील पराभवानंतर पक्षाचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनीही अनेक ट्विट केले होते. त्यांचे ट्विटही पक्षनेतृत्वावर हल्ला असल्याचे मानले जाते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...