आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MCD Workers Place Mounds Of Garbage Outside Manish Sisodia's Office

दिल्ली: थकित वेतनासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर फेकला कचरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी फेकला कचरा - Divya Marathi
उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी फेकला कचरा
नवी दिल्ली - दिल्ली महापालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयाबाहेर कचरा फेकून नाराजी व्यक्त केली. या कर्मचाऱ्यांचा वेतन वेळेवर होत नसल्यामुळे ते नाराज असून त्यांनी बुधवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. दुसरीकडे सिसोदिया यांनी दिल्ली सरकारने एमसीडीचा पूर्ण निधी दिला असल्याचे सांगितले आहे.

सिसोदियांचा भाजपवर आरोप
- उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर आरोप केला आहे. ते म्हणाले, जे लोक आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही. दिल्लीची स्वच्छता राखू शकत नाही, त्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही. भाजप एमसीडी चालवू शकत नाही अशी अवस्था आहे. सिसोदिया यांनी महापालिकेची पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण
थकित वेतन आणि मागण्या मान्य होत नसल्यामुळे नाराज मनपाच्या 1 लाख कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर आहेत. स्वच्छता विभागासोबत इतरही विभागांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
मनपा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली, मात्र कर्मचारी संघटना मागे हटण्यास तयार नाहीत. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरही आंदोलन केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कर्मचाऱ्यांचे आंदोलन