आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीटबॅन: आता चौथे राज्य; छत्तीसगडमध्ये 9, लुधियानात एक दिवस बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वानिमीत्त महाराष्ट्र, राजस्थाननंतर आता छत्तीसगड आणि पंजाबमध्येही मांसबंदी घालण्यात आली आहे. पर्युषण पर्वामुळे देशात सर्व प्रथम महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महानगर पालिकेने मांस-मटन खरेदी विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर हे लोण मुंबई, नाशिक नंतर जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचले. दरम्यान सर्वबाजूने होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आणली आहे.

छत्तीसगड सरकारने राज्यात नऊ दिवस मांस खरेदी-विक्री बंदी घातली आहे. जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व आणि त्यानंतर गणेश चतुर्थीनिमीत्त राज्यात 10 ते 18 सप्टेंबरपर्यंत मांस-मटन कत्तलखाने बंद ठेवले जाणार आहे. त्यासोबतच खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. राजपूर महानगर पालिकेने राज्य सरकारच्या निर्णयाआधी 8 सप्टेंबर रोजी शहरात 10 ते 17 सप्टेंबर पर्यंत मांसबंदी घातलेली आहे.
पंजाबमध्ये बंदी
गुजरातमधील अहमदाबाद, राजस्थान, जम्मु-काश्मीरनंतर पंजाबनेही बंदीचा कित्ता गिरवला आहे. लुधियाना पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनूसार, 17 सप्टेंबर रोजी शहरात जैन धर्मींयांच्या पर्युषण पर्वानिमीत्त मांस खरेदी-विक्रीवर बंदी आहे. हा आदेश सीआरपीसी कलम 144 नुसार घेण्यात आला आहे. ही बंदी हॉटेल, मटन विक्री दुकाने आणि नॉनव्हेज पदार्थ विक्री करणाऱ्या सर्व स्टॉल्सवर असणार आहे.

मांसविक्रेते गेले हायकोर्टात
छत्तीसगडमधील मांसविक्रीशी संबंधीत व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी देखील महानगर पालिकेने पर्युषण आणि गणेश चतुर्थी निमीत्त मांसबदी केली होती. त्याला कुक्कुट पालन व्यापाऱ्यांनी हायकोर्टात आव्हान दिले आणि स्थगिती मिळवली होती. असोसिएशनचे म्हणणे आहे की हायकोर्टाच्या स्थगितीनंतर पुन्हा बंदी घालणे हा कोर्टाचा अवमान आहे.
महाराष्ट्रात मांसविक्री बंद
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वकाळात 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह मीरा-भाईंदर, नाशिक महानगर पालिकेने सर्व कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यात सत्ताधारी भाजप- शिवसेना यांच्यात सामना रंगला आहे. भाजपच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. गुरुवारी शिवसेनाचे मुखपत्र 'सामना' मधून या बंदीवर सडकून टीका करण्यात आली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकेर यांनी देखील या बंदीला विरोध केला. ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला या जैनांनी शिकवू नये,’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे. (सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठे - कुठे बंदी

>>गुजरात - अहमदाबादचे पोलिस आयुक्त शिवानंद झा यांनी गुरुवारी एक आठवड्यासाठी गाय, बैल, बोकड, म्हैस यासारख्या प्राण्यांच्या मोकळ्या जागेतील कत्तलीला बंदी घातली आहे.
>>महाराष्ट्र - राज्यातील तीन महानगर पालिका क्षेत्रांमध्ये मांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात मुंबई, मीरा-भाईंदर आणि नाशिक महानगर पालिका यांच्या कार्यक्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत गुरुवार, शुक्रवारसह 17 आणि 20 सप्टेंबर यादिवशी बंदी लागू राहील. तर मीरा-भाईंदरमध्ये गुरुवारपासून आठ दिवसांसाठी मांसविक्री बंदी घालण्यात आली आहे.

>>राजस्थान - राजस्थान सरकारने गुरुवारी मांसविक्री बंदी घातली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार 17,18 आणि 27 सप्टेंबरपर्यंत मांसबंदी आहे.

>> जम्मू-काश्मीर - हायकोर्टाने जम्मू-काश्मीरमध्ये बीफ (गोमांस) बंदी घातली आहे. हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले आहेत की बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.

पुढील स्लाइडमध्ये, कोणत्या मांसावर बंदी ? प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश