आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Media Covering Only Modi, Ignoring Congress Leaders: Shakeel Ahmed

नरेंद्र मोदींना झुकते माप, आमच्या मापात पाप, कॉंग्रेसने उधळली मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला मीडियाकडून अवास्तव महत्त्व दिले जाते तर कॉंग्रेसचे पाच मुख्यमंत्री दिल्लीत असतानाही त्यांच्या सभा कव्हर केल्या जात नाहीत, या शब्दांत कॉंग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नरेंद्र मोदींच्या रॅलीला मोठा जनसमुदाय उपस्थित राहत असल्याने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रचार सभा रद्द करीत असल्याचे वृत्तही शकील अहमद यांनी फेटाळून लावले. पत्रकारांसमोर आपल्या पक्षाची नाराजी व्यक्त करताना शकील अहमद म्हणाले, की दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, हिमाचलचे मुख्यमंत्री विरभद्रसिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा, केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुडा कॉंग्रेसच्या उमेदवारांचा दिल्लीत प्रचार करीत आहेत. परंतु, तरीही त्यांच्या सभांना मीडियाकडून महत्त्व दिले जात नाही. या उलट नरेंद्र मोदींची सभा अगदी लाईव्ह कव्हर केली जाते.
मोदींच्या गुजरातपेक्षा कॉंग्रेसशासित या पाच राज्यांनी भरीव प्रगती केली आहे. तरीही मीडियाने त्याकडे सोईस्कर डोळेझाक केली आहे, असेही शकील अहमद म्हणाले.
कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा सभा का रद्द करण्यात आल्या, वाचा पुढील स्लाईडवर