आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Media Report Claims Lashkar E Taiyaba Terrorists Were On Pakistani Ship 4 Person

नौकेतील चौघे लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी?; मोठा घातपात करण्याचा होता इरादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समुद्री मार्गाने नौकेत बसून भारतात येणारे चौघे लष्कर-ए-तैयबाचे (LET) दहशतवादी होते. तसेच देशात मोठा घातपात करण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, भारताच्या हद्दीत शिरल्यानंतर नौदलाच्या जवानांनी नौकेला चारही बाजुंनी घेरले तेव्हा दहशतवादींनी आत्मघातकी हल्ल्याने स्वत:ला उघवून घेतले. गुजरातमधील पोरबंदरपासून 365 किलोमीटर अंतरावर 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली.

नौकेवरील दहशतवादी कराचीमध्ये असलेल्या लष्करच्या कमांडरशी मोबाइलवरून संभाषण करत होते. हे संभाषण नौदलाने ट्रॅक केले. नौदलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या नौकेचा पाठलाग केला. मात्र, दहशतवाद्यांनी नौकेचा वेग वाढवून, पळ काढला मात्र, नौदलाच्या जवानांनी चौघांच्या नौकेला घेरले त्याचवेळी नौकेवरील दहशतवादींनी आत्मघातकी हल्ल्याने स्वत:ला उघवून घेतले.

'भारतात वातावरण पाहून घातपात करा, असे निर्देश दहशतवाद्यांना देण्यात आले होते. नौकेत बसलेल्या दहशतवाद्यांना LET चे कमांडर कराची बसून मार्गदर्शन करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर एखादी नौका हायजॅक करण्याचा दहशतवाद्यांचा मंसुबा होता. त्याचप्रमाणे भारतात मोठा घातपात करण्याचा त्यांचा इरादा होता, असे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, चौघे कराचीहुन भारतात येण्यासाठी निघाले होते. कराची बसलेले लष्कराचे कमांडर चौघांना निर्देश देत होते. यामुळे नौका स्फोटात खातमा झालेल्या चौघांच्या नातेवाईकांना लष्कर-ए-तैयबाने 5 लाख रुपये दिल्याची माहित‍ी मिळाली आहे.
स्फोट झालेल्या नौकेवर मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटके होती. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर ते दुसर्‍या नौकेने भारतात प्रवेश करणार होते. मात्र, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाइझेशनने (एनटीआरओ) या नौकेला कराचीहून रवाना झाल्यानंतर ट्रॅक करण्याचे काम सुरु केले होते. एनटीआरओने ही माहिती भारतीय नौदलाला दिली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, कोस्ट गार्डच्या जवानांनी पाठलाग केल्यावर नौकेतील चौघांनी स्वतःला उडवून दिले.