आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांनी विपश्यना करावी, आपच्या शिसोदियांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांपासून आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सार्वजनिक स्तरावर स्पष्टीकरण देण्याची मागणी माध्यमांकडून होत आहे. यावर त्यांचे सहकारी व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी माध्यमांना मौलिक सल्ला दिला आहे. माध्यमांना विपश्यनेची गरज आहे. त्यांनी चिंतन करावे, असा मैत्रिपूर्ण सल्ला शिसोदियांनी माध्यम प्रतिनिधींना दिला आहे. दिल्ली डायलॉग कमिशनचे (डीसीसी) चे माजी सदस्य आशिष जोशींनी दिल्ली सरकारच्या सर्व सदस्यांना विपश्यनेची गरज आहे. डीसीसी सल्लागार समिती आहे.

त्यावर माध्यमांनी शिसोदियांची प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर माध्यमांनाच विपश्यनेची तातडीने गरज असल्याचे शिसोदिया म्हणाले. दिल्लीतील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पायाभरणी समारंभाला शिसोदिया आले होते. त्या वेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. एका न्यूज पोर्टलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनीही माध्यमांवर प्रखर टीका केली होती. आपला संपवण्याची सुपारी बहुतांश माध्यमांनी घेतल्याचे केजरीवाल बोलले होते. माध्यमांच्या वार्तांकनाच्या बनावट क्लिप्स आम्ही जनतेच्या न्यायालयात दाखवू, असेही ते म्हणाले. जनतेच्या न्यायालयात माध्यमांची सुनावणी होईल.