आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासी डॉक्टर्स संपावर, दिल्लीकर झाले हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील २० रुग्णालयांतील २००० निवासी डॉक्टर्स अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. अत्यावश्यक आैषधांचा तुटवडा, कामाच्या ठिकाणी सुरक्षा, कामाचे निश्चित तास आणि वेळेवर वेतन या ४ प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

दिल्ली सरकार व केंद्र शासनाची रुग्णालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणार्‍या २० रुग्णालयांतील डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांना या संपाचा फटका बसणार आहे. बाह्यरुग्ण विभाग आणि खासगी वाॅर्ड सेवांवर या संपाचा परिणाम दिसून येईल. आपत्कालीन सेवांना यातून वगळण्यात आले.

सरकारकडून दुर्लक्ष
निवासी डॉक्टरांनी यापूर्वी आपल्या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले होते. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकार मागण्यांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याने संप पुकारणे भाग पडले.
बातम्या आणखी आहेत...